शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीचे वारे लागले वाहू ; राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 16:44 IST

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार तब्बल ५२ इच्छुकांनी अर्ज केले आहेत...

ठळक मुद्देजिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघासाठी १७५ इच्छुक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार विद्या चव्हाण यांच्या उपस्थित मुलाखती

पुणे : मतदार संघा संदर्भातील चर्चा, मेळावे, इच्छुकांच्या मुलाखती अशा विविध पातळीवर सध्या विविध पक्षांकडून विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. यामध्ये शहर आणि जिल्ह्यात सर्वच ठिकाणी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने येत्या शनिवारी (दि.२७) आणि रविवारी (दि.२८) जुलै रोजी पुण्यात मार्केटयार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयामध्ये जिल्ह्यातल्या २१ विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती आयोजित केल्या आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार विद्या चव्हाण यांच्या उपस्थित या मुलाखती घेण्यात येणार आहे.     याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले की, येत्या शनिवारी जिल्ह्यातील  भोर, मावळ, शिरुर-हवेली, खेड-आळंदी, जुन्नर, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या दहा विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. सकाळी ९.३० वाजता भोर विधानसभा मतदार संघापासून मुलाखती सुरु होऊन दुपारी ३ वाजता पुरंदर विधानसभा मतदार संघातील मुलाखतीने समारोप करण्यात येणार आहेत.     त्यानंतर रविवार (दि.२८) रोजी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड येथील ११  विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी सांगितली. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार तब्बल ५२ इच्छुकांनी अर्ज केले आहेत. यामध्ये सर्वांधिक इच्छुक हडपसर आणि खडकवासला मतदार संघात आहेत. यामुळे येथे उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच होणार असून, मुलाखती दरम्यान प्रत्येकजण मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाJayant Patilजयंत पाटीलElectionनिवडणूक