शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

..म्हणूनच कायम जमिनीवर राहू शकलो... तबलावादक पं. नाना मुळे यांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 5:35 PM

'कलेला वय नसते हे माझ्या डोक्यात फिट बसले आहे! लहान मुलांचे सादरीकरण ऐकायला आणि लहानांना साथसंगत करायलाही मी बसतोे, असे मत ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देस्वत:ला शोधणे महत्त्वाचे असते : पं. नाना मुळे मुळे यांनी भीमसेन जोशी यांबरोबरच अनेक दिग्गज कलाकारांना केली तबल्याची साथसंगत

पुणे : 'कलेला वय नसते हे माझ्या डोक्यात फिट बसले आहे! लहान मुलांचे सादरीकरण ऐकायला आणि लहानांना साथसंगत करायलाही मी बसतोे. तेव्हा त्यांच्याकडूनही शिकायला मिळते. त्यामुळेच मी कायम जमिनीवर राहिलो. 'हा काय गातो, तो काय वाजवतो,' असे म्हणत बसण्यापेक्षा स्वत:ला शोधणे महत्त्वाचे असते,' असे मत ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांनी व्यक्त केले.शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणा-या कलाकारांना सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाअंतर्गत दिला जाणारा 'वत्सलाबाई जोशी पुरस्कार' या वर्षी पं. नाना मुळे यांना जाहीर झाला आहे. या निमित्ताने 'आर्य संगीत प्रसारक मंडळा'तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'अंतरंग' या कार्यक्रमात आज श्रीनिवास जोशी यांनी पं. मुळे यांची मुलाखत घेतली. या वेळी ते बोलत होते. पं. मुळे यांनी अनेक वर्षे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांबरोबरच अनेक दिग्गज कलाकारांना तबल्याची साथसंगत केली आहे.लहान वयात तबलावादन सुरू केल्यापासून मोठमोठ्या गुरूंकडून तबला शिकण्याची मिळालेली संधी, प्रत्येक गुरूकडे मागितलेला तबलावादनाच्या ज्ञानाचा प्रसाद, संगीत नाटकांसाठी गाणी बसवताना आणि प्रत्यक्ष रंगमंचावर ती गाणी सादर करताना गायक आणि तबलावादक यांच्यात होणा-या गमतीजमती, अशा विविध गोष्टींविषयी पं. नाना मुळे भरभरून बोलले. त्याबरोबरच त्यांच्या अद्वितीय तबलावादनाची झलकही प्रेक्षकांना अनुभवयाला मिळाली.'तबल्यावर कंठसंगीत वाजवणे सर्वांत कठीण असते. गाण्याची लय, बंदिश आणि अर्थ समजून वाजवावे लागते, तसेच रागाच्या स्वभावानुसार ठेका बदलत न्यावा लागतो. तबलावादकाने कुणाचेही गाणे पाडायचे नसते. एखादा गायक तालाला कमजोर असेल तरी त्याला सांभाळून घेत उत्तम साथ करणे ही तबलावादकाची सत्त्वपरीक्षा असते,' असे ते म्हणाले.'कट्यार काळजात घुसली' या नाटकाच्या ४०० प्रयोगांसाठी, तर 'मत्स्यगंधा' नाटकाच्या ३५० प्रयोगांसाठी आपण तबलावादन केल्याचे पं. मुळे यांनी सांगितले.  'कट्यार' पाहण्यासाठी मदन मोहन, आर. डी. बर्मन असे मोठमोठे संगीतकार येत आणि तबल्यासाठी विशेष दादही देत. मला चित्रपटांमध्ये वाजवण्यासाठी अनेकदा विचारणा झाली. परंतु मैफलींमध्ये वाजवणे हीच माझी आवड असल्यामुळे मी तिकडे गेलो नाही,'असेही पं. मुळे यांनी सांगितले.   याच दिवशी झालेल्या 'षड्ज' या कार्यक्रमात प्रजना परिमिता पराशेर दिग्दर्शित पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यावरील माहितीपट दाखवण्यात आला.

झाला जागा क्रिकेट प्रेमी दादरला राहायला असताना सचिन तेंडूलकर, विनोद कांबळी रूपक बरोबर अभ्यासाला घरी येत आणि आम्लेट खाऊन घरात अभ्यास करण्याऐवजी डूलक्या घेत. तेव्हा त्यांना फटके देत मी त्यांना उठवून अभ्यासाला बसवायचो. त्याकाळी क्रिकेटर सुनिल गावस्कर फेमस होते आणि माझा आवडता क्रिकेटरही तोच होता, असे सांगून मुळे यांच्यातील क्रिकेटप्रेम जागे झाले.

टॅग्स :Puneपुणे