शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

#InternationalYogaDay2018 आता पाण्यातही योगा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 07:01 IST

घरात, ऑफिसमध्ये, शाळेत योग केल्याची अनेक उदाहरणे आपण बघतो. मात्र पुणे शहरात बुधवारी वेगळ्या प्रकारचा योग सादर करण्यात आला. योग दिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील बालगंधर्व रंगमंदिराजवळील नांदे तलावात पाण्यातला अर्थात ऍक्वा योगाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले.

ठळक मुद्देश्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे ऍक्वा योगाचे आयोजन  युवतींना जलतरण तलावात सादर केली वैविध्यपूर्ण आसने

पुणे : घरात, ऑफिसमध्ये, शाळेत योगासने केल्याची अनेक उदाहरणे आपण बघतो. मात्र पुणे शहरात बुधवारी वेगळ्या प्रकारचा योग सादर करण्यात आला. योगासन दिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील बालगंधर्व रंगमंदिराजवळील नांदे तलावात पाण्यातला अर्थात ऍक्वा योगासन प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले.  चैताली ठोंबरे, निधी घोरपडे, लौकीका माळगे, मनिषा कर्डीले या युवतींनी पाण्यामध्ये योगासने सादर केली. त्याच वेळी तलावाच्या बाजूने सुमारे १०० विद्यार्थ्यांनी बाहेर योगासने सादर करत त्यांना साथ दिली. 

ताडासन, नटराजासन, वीरभद्रासन, पतंगासन, पवन मुक्तासन अशा वैविध्यपूर्ण आणि तितक्याच कठीण अशा आसनांचे सादरीकरण पाण्यामध्ये करुन या योगप्रेमी युवतींनी सशक्त भारताचा संदेश दिला. श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे जागतिक योग दिनानिमित्त इन्स्टिटयूट आॅफ योगा पुणे संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी फोनद्वारे उपस्थितांशी संवाद साधून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. 

     आयोजक डॉ. राजेंद्र खेडेकर म्हणाले, ताण-तणाव आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात योग करणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी दशेपासूनच योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे आणि त्यांनी दैनंदिन जीवनात दररोज योगासने करावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पाण्यामध्ये आसने करणे अवघड असते, हा प्रकार परदेशात प्रचलित आहे. पुण्यामध्ये हा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला.योगाचार्य विदुला शेंडे म्हणाल्या, डोक्यापासून ते पायापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाला योगासनांमुळे व्यायाम मिळतो. पाण्यामध्ये केलेला अ‍ॅक्वा योगा हा वेगळ्या प्रकारचा व्यायामप्रकार आहे.  

 

 

टॅग्स :PuneपुणेYogaयोगInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनHealthआरोग्य