- विलास भेगडेतळेगाव दाभाडे : तळेगाव शहरात कोठेही साप दिसला की, ‘तिला’ बोलावणे धाडले जाते. साप विषारी असो की बिनविषारी, ती निडरपणे पुढे सरसावते. त्याला अलगद पकडते आणि अधिवासात सोडून देते. गेल्या दहा वर्षांत तिने अनेक विषारी - बिनविषारी साप पकडून त्यांना अधिवासात सोडून दिले आहे. केतिका कासेटवार (वय ४४) असे तिचे नाव. प्राणी कल्याण व पर्यावरण संवर्धनासाठी प्राधान्य देणाऱ्या वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या त्या सक्रिय सदस्य आहेत.
सर्पमित्र किरण मोकाशी, नीलेश गराडे, जिगर सोलंकी आणि अन्य ज्येष्ठ सदस्यांकडून केतिका यांनी सापाविषयीचे बारकावे आत्मसात केले. ग्रामीण भागात अजूनही सापांविषयी गैरसमजुती आणि अंधश्रद्धा आहेत. त्या दूर होणे गरजेचे आहे. त्यासाठी केतिका यांनी जनजागृती मोहिमा राबविल्या. याशिवाय इतर प्राण्यांचीही सुटका केली आहे.
त्या वन्यजीव बचावकर्ती आहेत. त्यांनी नेहमीच निसर्गसंवर्धनास प्राधान्य दिले आहे. साप हाच खरा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो उंदरांचा फडशा पडतो. सापांविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. सापांना वाचविणे आणि मानवता हाच खरा धर्म आहे, यासाठी त्या कष्ट घेत आहेत. अनुभवाच्या जोरावर त्यांनी बचाव मोहिमा आणि जनजागृतीचे कार्यक्रम मोठ्या हिमतीने केले.
भारतात सापांची भीती मुख्यत्वे ज्ञानाच्या अभावामुळे उद्भवते आणि जागरूकता हे सहअस्तित्वाचे सर्वात शक्तिशाली साधन आहे, यावर केतिका यांचा दृढ विश्वास आहे. वन्यजीव जागरूकता केवळ संवर्धन कार्य म्हणून त्या पाहत नाहीत तर सहानुभूती, वैज्ञानिक विचारसरणी आणि नैसर्गिक जगाबद्दल आदर वाढवण्याचा शक्तिशाली मार्ग म्हणून पाहतात.
मानव आणि प्राणी एकमेकांवर अवलंबून आहेत आणि हे परस्परसंबंध समजून घेणे भविष्यातील पिढ्यांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे आहे. - केतिका कासेटवार, सर्पमित्र, तळेगाव दाभाडे
Web Summary : Ketika Kasetwar, a Talegaon wildlife rescuer, fearlessly saves snakes, educating about their importance. She dispels myths, advocating for coexistence and conservation, emphasizing snakes' role in agriculture. She believes awareness fosters respect for nature.
Web Summary : तलेगाँव की वन्यजीव रक्षक केतिका कासेटवार निडरता से सांपों को बचाती हैं, उनके महत्व के बारे में शिक्षित करती हैं। वह मिथकों को दूर करती हैं, सह-अस्तित्व और संरक्षण की वकालत करती हैं, कृषि में सांपों की भूमिका पर जोर देती हैं। उनका मानना है कि जागरूकता प्रकृति के प्रति सम्मान बढ़ाती है।