शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

International Owl Center: घुबडांवरील संशोधनासाठी डॉ. प्राची मेहता यांना आंतरराष्ट्रीय गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 19:37 IST

डॉ. प्राची मेहता गेली अनेक वर्षांपासून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि इतर ठिकाणी घुबडांच्या संवर्धनाबाबत काम करत आहेत

पुणे : अतिशय दुर्लक्षित असलेल्या घुबडाबद्दल संशोधन करत असलेल्या वन्यजीव शास्त्रज्ञ व वाइल्डलाइफ रिसर्च अँड कन्झर्वेशन सोसायटी (WRCS) च्या संचालिका डॉ. प्राची मेहता यांना इंटरनॅशनल आऊल सेंटर (यूएसए) तर्फे ‘आंतरराष्ट्रीय आऊल हॉल ऑफ फेम’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. मेहता गेली अनेक वर्षांपासून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि इतर ठिकाणी घुबडांच्या संवर्धनाबाबत काम करत आहेत.  

घुबड हे सर्वोच्च शिकारी पक्षी आहे, पण त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यांच्या असामान्य दृष्टीमुळे आणि विचित्र आवाजामुळे, लोकांना अनेकदा घुबडांमध्ये अलौकिक शक्ती असल्याचा भ्रम होतो. घुबड हे खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण शिकारी पक्षी आहेत जे रात्री जगण्यासाठी विकसित झाले आहेत. भारतात घुबडांच्या ३४ प्रजाती आहेत. त्यांच्या निशाचर सवयी आणि गुप्त स्वभावामुळे त्यांना शोधणे आणि त्यांचे निरीक्षण करणे कठीण असते, त्यामुळे घुबडांवर फारसे संशोधन झालेले नाही. डॉ. मेहता यांनी खास फारेस्ट आऊलेट (रानपिंगळा) यावर काम केले आहे.  फॉरेस्ट आउलेट (रानपिंगळा) हे भारतामध्ये आढळणारे एक दुर्मिळ घुबड आहे. ते फक्त भारतातच आढळते. रानपिंगळा ही एक लहान घुबड प्रजाती आहे, ज्याचा आकार 19 से.मी. आहे. बहुतेक घुबड निशाचर असतात, पण रानपिंगळा दिवसा सक्रिय असतो. सध्या मध्य भारतातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आणि गुजरात, राज्यांमध्ये १२ ठिकाणी रानपिंगळा आढळतो. महाराष्ट्रात, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, आणि नंदुरबार, नाशिक व तानसा अभयारण्यात रानपिंगळा आढळतो. अलीकडेच सिल्वासा येथे रानपिंगळा सापडल्याचे समोर आले होते.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर  

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील रानपिंगळा आणि इतर घुबडांचा रेडिओ-टेलिमेट्री अभ्यास. घुबडांवर संशोधन करताना डॉ. प्राची मेहता यांनी घुबडांचा अभ्यास करण्यासाठी भारतात प्रथमच अनेक आधुनिक संशोधन तंत्रांचा वापर केला. त्यांनी घुबडांचे कलर बँडिंग, घुबडांच्या घरट्यांचे कॅमेरा ट्रॅप मॉनिटरिंग आणि घुबडांचे रेडिओ टेलीमेट्री यासारखे तंत्र वापरले. त्यामुळे आम्ही रानपिंगळा आणि इतर घुबडांच्या प्रजातींबद्दल महत्त्वाची वैज्ञानिक माहिती प्राप्त करू शकलो.

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकInternationalआंतरराष्ट्रीयpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड