सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय परीषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:11 IST2021-04-01T04:11:59+5:302021-04-01T04:11:59+5:30
पुणे : आरएमडी सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट कॅम्पस वारजे येथे ‘सस्टेन्याबिलिटी, चॅलेंजेस अँन्ड स्मार्ट प्रॅक्टिसेस इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँन्ड मॅनेजमेंट’ ...

सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय परीषद
पुणे : आरएमडी सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट कॅम्पस वारजे येथे ‘सस्टेन्याबिलिटी, चॅलेंजेस अँन्ड स्मार्ट प्रॅक्टिसेस इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँन्ड मॅनेजमेंट’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच झाली.
दोन दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय परिषदेला रिसर्च स्कॉलर्स अकॅडमिशन आणि इंडस्ट्री प्रोफेशनल्स यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिषदेचे आयोजन सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले, उपाध्यक्ष (एचआर) रोहित नवले, उपाध्यक्ष (अॅडमिन) रचना नवले-अष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. देशविदेशातून यात दोनशेपेक्षा जास्त संशोधन पेपर परिषदेत सादर झाले.
आरएमडी सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. व्ही. व्ही. दीक्षित यांनी परिषद संचालक पदाची जबाबदारी
स्वीकारत मार्गदर्शन केले. डॉ. शरद मुळीक (डीन अकॅडमिक्स) यांनी उद्घाटनप्रसंगी स्वागत केले. हिमालयन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हरीशंकर शर्मा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परिषदेच्या निरोप समारंभ कार्यक्रमात चैत्राली ईसावे, श्रीकांत ढमढेरे, विजयामोरी एसएन, विशाल दत्ता कोहीर, किशोर फड, सनमत शेट्टी, नीलेश ढोबळे, अली असगर, मयुरेश गुलामे, ए .आर. पेंढारी, डॉ.पी सेंठील कुमार, अंजली सपकाळ यांना उत्कृष्ट संशोधन पेपर सादरीकरणासाठी गौरवण्यात आले. परिषदेची संयोजक टिप्पणी ही डॉ. एम व्ही. नागरहल्ली, डॉ. स्नेहल भोसले, वीणा लोमटे, श्वेता काळे, डॉ. प्रतिभा आळंदकर यांनी दिली. समारोप डॉ. शीतल घोरपडे यांनी केला. डॉ. स्वाती विजय (डीन एमबीए) यांनी आभार मानले.