सोसायटीच्या शेतकऱ्यांना व्याजदरात सवलत

By Admin | Updated: September 2, 2015 04:02 IST2015-09-02T04:02:48+5:302015-09-02T04:02:48+5:30

येथील विविध कार्यकारी संस्थेच्या ६६८ शेतकऱ्यांना राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून १५ लाख रुपये एवढी व्याजदरामध्ये सवलत मिळाल्याचे अध्यक्ष आशाताई नरके यांनी सांगितले

Interest on the farmers in the society | सोसायटीच्या शेतकऱ्यांना व्याजदरात सवलत

सोसायटीच्या शेतकऱ्यांना व्याजदरात सवलत

तळेगाव ढमढेरे : येथील विविध कार्यकारी संस्थेच्या ६६८ शेतकऱ्यांना राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून १५ लाख रुपये एवढी व्याजदरामध्ये सवलत मिळाल्याचे अध्यक्ष आशाताई नरके यांनी सांगितले.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात
पार पडली.
या वेळी सभासदांना १२
टक्के लाभांशवाटप करण्यात
आले. संस्थेच्या माध्यमातून ४ कोटी १० लाख ५१ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले असून, संस्थेला ४५ लाख ५१ हजार रुपयांचा नफा झाल्याचे सचिव भाऊसाहेब लोहार यांनी सांगितले.
संस्थेचे ज्येष्ठ सभासद शेतकरी दशरथ केदारी यांना मान्यवरांच्या
हस्ते लाभांशवाटप करण्यात आले. या वेळी संस्थेच्या अध्यक्षा आशाताई नरके, उपाध्यक्ष प्रदीप ढमढेरे,
माजी अध्यक्ष बाळासाहेब ढमढेरे, श्रीकांत सातपुते, सुभाष ढमढेरे, शिवाजी भुजबळ, सुदाम
भुजबळ आदी मान्यवर उपस्थित
होते.

Web Title: Interest on the farmers in the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.