महादेव बोरावके यांना आंतरराज्य पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:10 IST2021-03-23T04:10:06+5:302021-03-23T04:10:06+5:30

नॅशनल रुलर डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव या संस्थेतर्फे या पुरस्काराची घोषणा केली आहे. कर्नाटक, ...

An inter-state award announced to Mahadev Boravke | महादेव बोरावके यांना आंतरराज्य पुरस्कार जाहीर

महादेव बोरावके यांना आंतरराज्य पुरस्कार जाहीर

नॅशनल रुलर डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव या संस्थेतर्फे या पुरस्काराची घोषणा केली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा अशा या तीन राज्यांतून कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या विशेष व्यक्तींना प्रत्येक वर्षी असा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. माळशिरस गावचे सरपंच महादेव बोरावके यांनी गाव व परीसर विकासाची अनेक कामे केली. त्याचप्रमाणे, श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथील विविध विकासकामात त्यांनी विशेष लक्ष देऊन आज अनेक कामे सुरू आहेत. २८ मार्च रोजी बेळगाव येथे गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

Web Title: An inter-state award announced to Mahadev Boravke