शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Pune: 'नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हाजीर हो...'; न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 20:47 IST

पुणे : मेगा सेंटर हडपसर येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित न करता पूर्ववत चालू करावे यासाठी जनअदालत संस्थेने दाखल ...

पुणे : मेगा सेंटर हडपसर येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित न करता पूर्ववत चालू करावे यासाठी जनअदालत संस्थेने दाखल केलेल्या दाव्यात नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांना वरिष्ठ दिवाणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मेगा सेंटर, हडपसर येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित न करता पूर्ववत विनाखंड चालू राहण्याकरिता जन अदालत संस्थेचे अध्यक्ष ऍड. सागर नेवसे यांच्या मार्फत नोंदणी महानिरीक्षक, नोंदणी जिल्हा निबंधक, दुय्यमनिबंधक हवेली ३, समुचित अधिकारी यांच्या विरुद्ध वरिष्ठ दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. गेल्या २० वर्षांपासून हे कार्यालय कार्यरत आहे. परंतु २०२१ पासून कोणते ही योग्य कारण न देता संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी ते कार्यालय बंद ठेवले. त्यामुळे त्या भागातील शेतकरी, विक्रेते, बँका, जमीन खरेदीदार यांना १० ते १२ किलोमीटरवर जाऊन दस्त नोंदणी करावी लागत आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे.

याबद्दल वेळोवेळी स्थानिक नागरिक, व्यावसायिक, पुढारी, वकील वर्ग यांनी नोंदणी कार्यालय चालू करण्याबाबत लेखी, तोंडी विनंती केली. मात्र, प्रशासन ढिम्मच होते. उलट हे कार्यालय कोणाच्या तरी फायद्यासाठी स्थलांतरितकरण्याचा घाट घातला गेला. याला विरोध करण्यासाठी व कार्यालय पुन्हा चालू करण्यासाठी जन अदालत संस्थेकडे नागरिक, वकील यांच्या तक्रारी आल्या, त्यानंतर संबंधित अधिका-यांना कायदेशीर नोटिसा पाठवण्यात आल्या. तरीसुद्धा कोणती ही कृती त्यांनी न केल्याने संबंधित अधिका-यांच्या विरुद्ध जन अदालत चे अध्यक्ष ऍड. सागर नेवसे व ऍड. सुभाष वीर यांनी संस्थेतर्फे दावा दाखल केला व दाव्यात हडपसर येथील ’मेगा सेंटर’ मधील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित न करता पूर्ववत चालू करावे यासाठी अनिवार्य मनाई आदेशाची मागणी केली. मानखैरे न्यायालयाने नोंदणी महानिरीक्षक, नोंदणी जिल्हा निबंधक , हवेली ३ दुय्यम निबंधक, समुचित अधिकारी यांच्या विरुद्ध नोटीस जारी करून सर्वांना दि. १६ ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी