पोलीस आयुक्तांकडून मध्यभागातील बंदोबस्ताची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:11 IST2021-04-24T04:11:45+5:302021-04-24T04:11:45+5:30

पुणे : शहरात कडक निर्बंध लागू केल्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी अचानक विश्रामबाग पोलीस ठाण्यास भेट दिली. ...

Inspection of central security by the Commissioner of Police | पोलीस आयुक्तांकडून मध्यभागातील बंदोबस्ताची पाहणी

पोलीस आयुक्तांकडून मध्यभागातील बंदोबस्ताची पाहणी

पुणे : शहरात कडक निर्बंध लागू केल्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी अचानक विश्रामबाग पोलीस ठाण्यास भेट दिली. तेथील सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. मध्यभागातील बंदोबस्ताची पाहणी केली. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी पोलिसांनी काटेकोरपणे नियमावलीचे पालन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

आयुक्तांनी पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्याशी बंदोबस्ताबाबत चर्चा केली. त्यानंतर गुप्ता यांनी मंडई तसेच बेलबाग चौकातील नाकाबंदीची पाहणी केली. बंदोबस्तावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबर संवाद साधला. बंदोबस्त करताना सतर्क रहा, काळजी घ्या, असे त्यांनी सांगितले. फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवाराची त्यांनी पाहणी केली. बंदोबस्तावरील सर्व पोलिसांनी कोरोना चाचणी केल्याचे तसेच पोलीस ठाण्याची इमारत तसेच परिसर स्वच्छ असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Inspection of central security by the Commissioner of Police