दूषित पाण्याबद्दल पाणीपुरवठा विभागाची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:10 AM2021-03-30T04:10:03+5:302021-03-30T04:10:03+5:30

शिरूर : शिरूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने मैला, केमिकल मिश्रीत दुषित पाणी पाजले जात असल्याचे नगरपरिषदेकडूनच कबुली ...

Inquire the water supply department about contaminated water | दूषित पाण्याबद्दल पाणीपुरवठा विभागाची चौकशी करा

दूषित पाण्याबद्दल पाणीपुरवठा विभागाची चौकशी करा

Next

शिरूर : शिरूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने

मैला, केमिकल मिश्रीत दुषित पाणी पाजले जात असल्याचे नगरपरिषदेकडूनच कबुली दिली. शिरूरकरांनी हे पाणी पिऊ नये, असा फतवाच नगरपरिषदेने काढला असल्याने शिरुर नगर परिषद पाणीपुरवठा विभागाची लक्तरे यामुळे समोर आले असल्याचे भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी सांगताना नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

नगरपरिषदेच्या नावाने एक निवेदन सार्वजनिक करण्यात आले आहे. यावरून ही माहिती समोर आली आहे.

शिरुर शहर भाजपा युवा मोर्चा च्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद यांना शिरुर शहरातील दुषीत पाण्याच्या संदर्भात आंदोलनाचे निवेदन देण्यात आले. इतरही काहींनी दुषित पाण्याची तक्रार केली. त्यानंतर नगरपारीषदेने निवेदन जाहीर केले आहे.

नगरपरिषदेचे निवेदन वाचुन आश्चर्य ही वाटले आणि संताप ही आला .शिरूर शहरातील नागरिकांना चक्क मैलायुक्त, रसायनमिश्रित पाणी पुरवठा नगरपरिषद करते?

रसायन मिश्रीत पाणी कोणत्या कंपन्यांचे? करीत सदर कंपन्यांना अभय कोणाचे? असा सवाल पाचंगे यांनी व्यक्त केला आहे.

शिरुर शहरातील नागरिकांना केमिकल मिश्रीत पाणी, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे कंपन्यांचे कंत्राटे म्हणून तर कारवाई करण्यास टाळाटाळ तर नाही ना असे अनेक सवाल उद्योग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संजय पाचंगे यांनी उपस्थित केला असून शिरूर शहराला स्वच्छ व पिण्या जोगे पाणी देण्यास शिरुर नगर परिषद पाणी पुरवठा विभाग कमी पडला असल्याचा आरोप त्यांनी केला

Web Title: Inquire the water supply department about contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.