पालक मागणार न्यायालयात दाद
By Admin | Updated: July 9, 2014 23:40 IST2014-07-09T23:40:45+5:302014-07-09T23:40:45+5:30
डॉ़ विखे पाटील फाऊंडेशनच्या शाळेमध्ये 25 टक्के आरक्षित जागांवर प्रवेश देण्यास प्रतिसाद न दिल्याने आता पालक न्यायालयात दाद मागणार आहेत़

पालक मागणार न्यायालयात दाद
पुणो : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) डॉ़ विखे पाटील फाऊंडेशनच्या शाळेमध्ये 25 टक्के आरक्षित जागांवर प्रवेश देण्यास प्रतिसाद न दिल्याने आता पालक न्यायालयात दाद मागणार आहेत़ शाळेने अजूनही मुलांना प्रवेश न दिल्याने आजपासून पालकांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली़
‘आरटीई’ अंतर्गत शिक्षण विभागाने लॉटरी पद्धतीने विखे पाटील शाळेमध्ये 25 टक्के आरक्षणानुसार 4क् विद्याथ्र्याना ज्युनिअर केजीमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. आरक्षणातील प्रवेशाबाबत डॉ. विखे पाटील फाउंडेशन उच्च न्यायालयाच्या मागील वर्षी दिलेल्या अंतरिम आदेशाच्या आधारे शाळेकडून हा दावा केला जात आहे. आदेशामध्ये शासनाने हमीपत्र द्यावे किंवा पालक शुल्क भरायला तयार असतील तर प्रवेश करावेत, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र, शाळा केवळ पहिल्या मुद्यावरच बोट ठेवत आहे. शुल्क द्यायची तयारी असतानाही शाळेकडून ते नाकारले जात आहेत. त्याविरोधात आंदोलन केल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने उच्च न्यायालयाच्या दाद मागणार आह़े
याबाबत नगरसेवक दत्तात्रय बहिरट यांनी सांगितले, की विद्याथ्र्याना त्रस होऊ नये, याची काळजी घेऊन आंदोलन केले जात आहे. पण, शाळेकडून प्रतिसाद न मिळाल्याने आजपासून साखळी उपोषण सुरु केले आह़े उद्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार आहोत़ (प्रतिनिधी)