शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

...आणि त्यांनी उचलला झाडांना वेदनामुक्त करण्याचा विडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 16:12 IST

झाडांना वेदाना मुक्त करण्यासाठी नेल फ्री,अाणि पेन फ्री हे कॅम्पेन पुण्यातील माधव पाटील व त्यांचे सहकारी राबवत अाहेत. यात शहरातील झाडांना ठाेकण्यात अालेले खिळे काढण्याचे काम दर अाठवड्याच्या रविवारी करण्यात येते.

ठळक मुद्देगेल्या तीन अाठवड्यांपासून सुरु अाहे कॅम्पेनएक किलाेहून अधिक वजन भरेल इतके खिळे व तारा झाडांवरुन काढण्यात अाल्या

पुणे : बाहेरगावी असल्याने अंगणातील तुळशीला पाणी देता न आल्याने तुळस सुकून गेली.  आपण पाणी देऊ न शकल्याने तुळस मेल्याचे मुलीने वडीलांना सांगितले. मुलीच्या तुळस मेली या शब्दप्रयोगाने त्यांच्या मनात घर केले. आणि येथून पुढे प्रत्येक झाडाला वेदनामुक्त करण्याचा विडाच त्यांनी उचलला.    ही कहाणी आहे, पुण्यात अंघोळीची गोळी या शिर्षकाखाली पर्यावरण रक्षणाबाबत जागृती करणाऱ्या माधव पाटील यांची. माधव पाटील आणि त्यांच्या मित्रांनी नेल फ्री अ‍ॅण्ड पेन फ्री ट्री असे कॅम्पेन सुरु केले असून या अंतर्गत पुणे शहरातील विविध झाडांना जाहीरात लावण्यासाठी ठोकण्यात आलेले खिळे काढण्याचे काम करण्यात येत आहे.  गेल्या तीन आठवड्यांपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून आत्तापर्यंत शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयापासून ते बालगंधर्व पर्यंत असलेल्या झाडांना ठोकण्यात आलेले खिळे काढण्यात आले आहेत. 

    माधव पाटील हे पेशाने इलेक्ट्रिक कल्संटंट आहेत. मात्र त्यांना लहानपणापासूनच पर्यावरणाबद्दल आस्था आहे. त्यांनी आंघोळीची गोळी या शिर्षकाखाली या आधीही अनेक उपक्रम राबविले आहे. पाटील हे झाडांच्या संवदेना यांवर अभ्यास करत असताना झाडांनाही भावना असतात याचे विस्तृत विवेचना करणारा लेख त्यांच्या वाचणात आला. तेव्हापासून त्यांच्या डोक्यात वेदनामुक्त झाड ही संकल्पना घोळत होती. यंदाच्या होळी पासून त्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. दर रविवारी पाटील व त्यांचे सहकारी भेटून शहरातील विविध भागातील झाडांना ठोकण्यात आलेले खिळे काढण्याचे काम करताता. दर आठवड्याला कमीत कमी दहा झाडांना ठोकण्यात आलेले खिळे काढायचेच असा दृढ निष्चय त्यांच्या टीमने केला आहे.     या बाबात बोलताना पाटील म्हणाले, झाडांनाही वेदना असतात याबद्दलचा लेख माझ्या वाचणात आला होता. त्यातच आमच्या अंगणातील तुळस पाण्याअभावी जळून गेल्याचे माझ्या मुलीने माझ्या निदर्शनास आणले. तेव्हापासून झाडांना नेल फ्री व पेन फ्री करण्याचा विचार डोक्यात घोळत होता. यंदाच्या होळी पासून आम्ही या उपक्रमाला सुरुवात केली आहे. हा उपक्रम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवून त्यांना या अभियानात सामिल करुन घेण्याचा आमचा विचार आहे. 

टॅग्स :PuneपुणेBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरenvironmentवातावरण