बालगंधर्व रंगमंदिर पाडून ‘पुलं’ना अभिवादन करणार का? महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 03:56 AM2018-03-08T03:56:42+5:302018-03-08T03:56:42+5:30

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीला या वर्षी ८ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी पुलंच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली झाली. ‘बालगंधर्व रंगमंदिर पाडून जनशताब्दी वर्षात पुलंना अभिवादन करणार का?’ अशा शब्दांत महाराष्ट्र साहित्य परिषदेने बालगंधर्व रंगमंदिर पाडून पुनर्विकास करण्याच्या पुणे महापालिकेच्या निर्णयाला विरोध केला आहे.

 Will Balgandharva decorate theater and greet 'Pulan'? The question of Maharashtra Sahitya Parishad | बालगंधर्व रंगमंदिर पाडून ‘पुलं’ना अभिवादन करणार का? महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सवाल

बालगंधर्व रंगमंदिर पाडून ‘पुलं’ना अभिवादन करणार का? महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सवाल

Next

पुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीला या वर्षी ८ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी पुलंच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली झाली. ‘बालगंधर्व रंगमंदिर पाडून जनशताब्दी वर्षात पुलंना अभिवादन करणार का?’ अशा शब्दांत महाराष्ट्र साहित्य परिषदेने बालगंधर्व रंगमंदिर पाडून पुनर्विकास करण्याच्या पुणे महापालिकेच्या निर्णयाला विरोध केला आहे.
‘बालगंधर्व रंगमंदिर ही केवळ दगडविटांची निर्जीव वास्तू नाही. या वास्तूशी कलावंत आणि रसिकांचे भावनिक नाते आहे. अनेक दिग्गज कलावंत आणि सारस्वतांच्या कलाविष्काराने आणि पदस्पर्शाने पावन झालेली ही वास्तू आहे. साहित्यिक आणि कलावंतांना ऊर्जा देणारे बालगंधर्व रंगमंदिर हे सर्जनकेंद्र आहे. या वास्तूची निगा व देखभाल राखण्यात पूर्णत: अपयशी ठरलेली पुणे महापालिका ही वास्तू पाडून पुनर्विकासाची योजना आखत आहे. ही बाब चीड आणणारी आहे. पुणेकर रसिकांच्या भावना लक्षात घेऊन ही वास्तू जपण्यासाठी प्रयत्न करावेत. नाट्यसंकुल दुसºया जागेत उभे करावे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा निर्णय घेताना साहित्य आणि कलाक्षेत्रातील लोकांशी बोलून, त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात, असे संबंधितांना वाटत नाही यातच त्यांचा कोडगेपणा दिसून येतो,’ अशी संतप्त प्रतिक्रिया मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली.
‘पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, याचा विसर महापालिकेला पडला आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे सांस्कृतिक वैभव आहे,’ असेही ते म्हणाले.

जन्मशताब्दी वर्षात तरी गदिमांचे स्मारक करा
महाराष्ट्रवाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाबाबत पुणे महापालिका कमालीची उदासीन आहे. ग. दि. माडगूळकर यांची जन्मशताब्दी आली, तरी पुण्यात त्यांचे स्मारक होऊ शकले नाही. या वर्षात तरी ते करून दाखवा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

कट सुज्ञ नागरिकच उधळून लावतील : सुरेखा पुणेकर
हजारो कलाकारांचे मंदिर व शहराची ओळख असलेली बालगंधर्व रंगमंदिर ही ऐतिहासिक वास्तू पाडण्याचा कट सुज्ञ पुणेकरच उधळून लावतील, असे लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी सांगितले. शिवसेना शिवाजीनगर मतदारसंघाच्या वतीने बालगंधर्व येथे कलाकार-नागरिक यांची मते जाणून घेण्यासाठी स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती.
कलाकार आणि पुणेकरांच्या भावनांचा विचार न करता भाजपाने या वास्तूचे व्यावसायिक सेंटर उभारण्यासाठी हा घाट घातला आहे. ही वास्तू कदापि पाडू देणार नाही, असे क्षेत्रप्रमुख उमेश वाघ म्हणाले. विभागप्रमुख राहुल शिरोळे यांनी केलेल्या या आंदोलनात सुनील महाजन, अभिनेता पवनकुमार, निर्माते बाबा पठाण, मोहन कुलकर्णी, वरुण कांबळे, गायक जितेंद्र भुरूक, रेश्मी मुखर्जी यांच्यासह अनेकांनी बालगंधर्व पाडण्यास विरोध दर्शविला. सुरेखा पुणेकरांसह उपविभागप्रमुख हेमंत डाबी, मंगेश खेडेकर, सुयोग भावे, प्रवीण डोंगरे, केदार सिद्धेश्वर यांनी जनजागृती पत्रकांचे वाटप करून नागरिकांची स्वाक्षरी घेतली.

Web Title:  Will Balgandharva decorate theater and greet 'Pulan'? The question of Maharashtra Sahitya Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.