शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

डीएसके गुंतवणुकदारांकडून नमूना फॉर्ममध्ये मागाविली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 16:33 IST

डीएसके यांच्या मालमत्ता तसेच गाड्यांच्या लिलावातून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देपोलीस जारी करणार नमूना फॉर्म फॉर्म पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर उपलब्ध 

पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणुक केलेल्या गुंतवणुकदारांकडून त्यांनी केलेल्या गुंतवणुकीची सविस्तर माहिती एका विशिष्ट तक्त्यात पुणेपोलिसांनी मागवलेली आहे. केलेल्या गुंतवणुकीची सविस्तर माहिती या तक्त्यानुसार गुंतवणूकदारांनी पुणे पोलिसांकडे सादर करायची आहे. महाराष्ट्र शासनाने फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची माहिती मागवण्यासाठी शासन परिपत्रक क्रमांक- एमपीआय १११९/प्र.क्र.०९/पोल-११, दि.- २५ फेब्रुवारी २०१९ नुसार ठेवीची परतफेड मिळवण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना जारी केला होता. त्यामूळे यापूर्वी जरी गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे आपल्या गुंतवणूकीची माहिती दिली असली तरी आता पुन्हा नव्या नमून्यात ती द्यायची आहे. याबाबत सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांनी सांगितले की, डीएसके यांच्या मालमत्ता तसेच गाड्यांच्या लिलावातून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गुंतवणुकदारांना हे पैसे परत देण्याचा निर्णय न्यायालयामार्फत होईल. यापूर्वी गुंतवणुकदारांनी तक्रार अर्ज देताना घरातील एकाच व्यक्तीने अर्ज केला असून त्यात अन्य नातेवाईकांच्या नावाने केलेल्या गुंतवणुकीची माहिती दिली आहे. त्यांना पैसे परत करताना ज्यांच्या नावावर प्रत्यक्ष गुंतवणुक केली आहे. त्यांच्याच बँक खात्यात हे पैसे जमा करावे लागणार आहेत. त्यादृष्टीने आम्ही सुधारित अर्ज नमूना तयार केला आहे़ तो जाहीर केला आहे. गुंतवणुकदारांनी यापूर्वी आपल्या गुंतवणुकीची माहिती पोलिसांना दिली आहे. मात्र, त्यानंतर शासनाने अर्जाचा नमूना जारी केला आहे. त्यामुळे त्या नमून्यानुसार माहिती देणे आवश्यक आहे. यात डी.एस.कुलकर्णी यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या व भागीदारी संस्थांच्या वतीने गुंतवणूकदारांशी संपर्क करणाऱ्या व्यक्ती, मॅनेजर, एजंट, प्रतिनिधी यापैकी ज्यांनी ठेवीसाठी गुंतवणूकदारास प्रवृत्त केले व अर्जदाराकडून रक्कम स्वीकारली. त्यांचे नाव, पत्ता, संपर्कासाठी उपलब्ध तपशील इत्यादी माहितीही देणे आवश्यक आहे. काही लोक मुद्दाम ठेवीदारांची दिशाभूल करून गुंतवणूकदारांशी संपर्क करणाऱ्या व्यक्ती, मॅनेजर, एजंट, प्रतिनिधी यांची माहिती देउ नका असे सांगत आहेत. त्यांच्यावर विश्वास नये कारण या मध्यस्थांकडून सुद्धा पैसे वसूल होणे गरजेचे आहे. अशा मध्यस्थांची संख्या बऱ्यापैकी मोठी आहे, असे विजय कुंभार यांनी सांगितले.पोलिसांनी जारी केलेला फॉर्म संकेतस्थळ व ब्लॉगवर उपलब्ध करून देत आहोत. त्यातील मजकूर भरून तो पुणे पोलिसांकडे संबधित गुंतवणूकदारांनी लवकरात लवकर द्यावा. तसेच ब्लॉगच्या शेवटी या फॉर्मचा मजकूर आहे. आवश्यक असेल तर तो कॉपी पेस्ट करून वापरता येईल. मात्र पोलिसांच्या फॉर्मशी तो पडताळून पहा  असे कुंभार यांनी सांगितले.़़़़़़़़़फॉर्म पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर उपलब्ध गुंतवणुकदारांना त्यांचे अर्जासाठी पुणे पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात येण्याची गरज नाही. आम्ही हा अर्ज पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देणार आहोत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरी बसूनच तो फॉर्म डाऊनलोड करुन भरावा़ असे सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीfraudधोकेबाजीCourtन्यायालयPoliceपोलिस