शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी पर्यटक, विमान प्रवास केलेल्या नागरिकांची माहिती द्या : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 19:45 IST

टुर्स अ‍ॅड ट्रॅव्हल्स कंपन्या, हॉटेल्स, लॉज व गेस्ट हाऊसवाल्यांना सूचना  

ठळक मुद्देविदेशात जाऊन आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यतामाहिती उपलब्ध करून न दिल्यास कारवाई करण्यात येणार

पिंपरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून देखील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. त्याअंतर्गत विदेशी पर्यटक, तसेच विदेशात जाऊन आलेल्या व विमानाने प्रवास करून शहरात आलेल्या नागरिकांची माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. याबाबत टुर्स अ‍ॅड ट्रॅव्हल्स कंपन्या, हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊस आदींना सूचना देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी याबाबत आदेश दिले आहेत. शहरातील विदेशी नागरिक तसेच पर्यटक व विदेशात जाऊन आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची आरोग्य तपासणी करून, आवश्यकतेनुसार विलगीकरण महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने त्यांची माहिती उपलब्ध होण्यासाठी शहरातील सर्व टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या, हॉटेल्स, लॉज व गेस्ट हाऊस यांनी त्यांच्याकडील अशा नागरिकांची, पर्यटकांची माहितीची नोंद करावी, त्यासाठी स्वतंत्र नोंदवही करून संबंधित पोलीस ठाणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाला ही माहिती द्यावी. तसेच आवश्यकतेनुसार पोलिसांना अवलोकनार्थ वेळोवेळी ही नोंदवही उपलब्ध करून देण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शुक्रवार, दि. १३ मार्च ते ११ मे २०२० या कालावधीसाठी हा आदेश लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास किंवा विदेशी पर्यटक व विदेशातून जाऊन आलेल्या नागरिकांची माहिती उपलब्ध करून न दिल्यास भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशातून स्पष्ट केले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसtourismपर्यटनhotelहॉटेलcorona virusकोरोना