शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या डब्यात घुसखोरी करणे ४०० जणांना महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 19:10 IST

मागील वर्षभरात त्यांच्याकडून ६२ हजार रुपयांचा दंड वसूल

ठळक मुद्देआता महिला सुरक्षेसाठी लांबपल्याच्या गाड्यांमध्येही महिला कर्मचारी नेमण्याचा निर्णयरेल्वेगाड्या तसेच स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आरपीएफ च्या खांद्यावर

पुणे : रेल्वेगाड्यांमध्येमहिलांसाठी आरक्षित असलेल्या डब्यांमध्ये घुसखोरी करणे ४०० हून अधिक पुरूष प्रवाशांना चांगलेच महागात पडले आहे. मागील वर्षभरात त्यांच्याकडून ६२ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे विभागातील रेल्वे सुरक्षा दलाकडून आता महिला सुरक्षेसाठी लांबपल्याच्या गाड्यांमध्येही महिला कर्मचारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिला सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती ‘आरपीएफ’कडून देण्यात आली. रेल्वेगाड्या तसेच स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आरपीएफ च्या खांद्यावर असते. त्यानुसार आरपीएफकडून विविध उपाययोजना राबविल्या जातात. विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. पुणे-लोणावळा लोकल गाड्यांमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये अनेकदा पुरूष प्रवासी घुसखोरी करतात. याबाबत अनेकदा तक्रारी आल्याने मागील काही महिन्यांपासून आरपीएफकडून या डब्यांमध्ये दोन महिला कर्मचाºयांची नेमणुक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून घुसखोर पुरूष प्रवाशांना पकडून कारवाई केली जात आहे. २०१९ या वर्षात अशा ४०२ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ६२ हजार १५० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘आरपीएफ’कडून पुणे विभागामध्ये असुरक्षित ठिकाणांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यानुसार गर्दीच्या वेळी असुरक्षित दररोज २९ लांबपल्याच्या गाड्या व ६ लोकल गाड्यांमध्ये गस्त घातली जाते. लांबपल्याच्या गाड्यांमध्ये सध्या एक पुरूष अधिकाºयासह तीन कर्मचारी असतात. या गाड्यांमध्ये त्यांच्यासोबत महिला कर्मचारी देण्याचा विचारही आरपीएफकडून केला जात आहे. यांसह महिला सुरक्षेसाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती ‘आरपीएफ’कडून देण्यात आली.  

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेWomenमहिलाreservationआरक्षण