ओतूर परिसरात संसर्ग वाढला ,१५ पाँझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST2021-04-01T04:12:29+5:302021-04-01T04:12:29+5:30

ओतूर परिसरातील बाधितांची एकूण संख्या १०६४ झाली आहे पैकी ९४८ बरे झाले आहेत ५२ जण उपचार घेत आहेत ...

Infection increased in Ootur area, 15 positive patients | ओतूर परिसरात संसर्ग वाढला ,१५ पाँझिटिव्ह रुग्ण

ओतूर परिसरात संसर्ग वाढला ,१५ पाँझिटिव्ह रुग्ण

ओतूर परिसरातील बाधितांची एकूण संख्या १०६४ झाली आहे पैकी ९४८ बरे झाले आहेत ५२ जण उपचार घेत आहेत १५जण घरीच उपचार घेत आहेत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे .

. मंगळवारी ५ ,बुधवारी ९ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे ओतूर शहरातील बाधितांची संख्या५४३ झाली आहे. ४७६ बरे झाले आहेत ३४ जण कोव्हीड सेंटर तर ९ जण घरीच उपचार घेत आहेत २४ जणांचा मृत्यू झाला आहे.

डिंगोरे येथील ७० पैकी ६५ बरे झाले. ३ जण कोव्हीड सेंटर तर १ घरीच उपचार घेत आहे. एकाचा मृत्यू झाला आहे. धोलवड येथील बाधितांची संख्या ४१ झाली आहे.३३ बरे झाले आहेत.. ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

खामुंडी येथील ३९पैकी फक्त २ जणावर उपचार सुरू आहेत. नेतवड माळवाडी १८पैकी १७ बरे तर एकावर उपचार सुरु केले आहेत. ठिकेकरवाडीत ४८ पैकी४२ बरे झाले आहेत. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीहरी साऱोक्ते यांनी दिली .

Web Title: Infection increased in Ootur area, 15 positive patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.