Pune Crime: टी शर्टमध्ये गुंडाळून अर्भक फेकले संस्थेच्या दारात, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Published: April 25, 2024 03:10 PM2024-04-25T15:10:39+5:302024-04-25T15:12:40+5:30

याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात परित्याग करणाऱ्या संबंधित अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

Infant wrapped in a t-shirt was thrown at the door of the institution, a case has been registered against an unknown person. | Pune Crime: टी शर्टमध्ये गुंडाळून अर्भक फेकले संस्थेच्या दारात, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Pune Crime: टी शर्टमध्ये गुंडाळून अर्भक फेकले संस्थेच्या दारात, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

पुणे : स्त्री जातीचे अर्भक जन्मला आल्यानंतर त्याला एका सामाजिक संस्थेच्या दारात फेकून परित्याग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात संबंधित अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनिषा शिंदे (४९, रा. वडगावशेरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनिषा शिंदे या चिल्ड्रन एचआरए म्हणून वडगावशेरी येथील प्रेमनगर येथे असलेल्या माहेर संस्थेत काम पाहतात. बुधवारी (ता. २४) रात्री पावणे आठच्या सुमारास त्यांना नव्याने जन्माला आलेले दोन दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक टी शर्टमध्ये गुंडाळून संस्थेच्या गेटवर सोडून दिल्याचे आढळून आले. याप्रकरणी त्यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक माने पुढील तपास करत आहेत.

Web Title: Infant wrapped in a t-shirt was thrown at the door of the institution, a case has been registered against an unknown person.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.