कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा येथील भीमा नदीपात्रात शुक्रवारी एका बेवारस नवजात अर्भकाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना आढळून आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. भीमा नदीपात्रातील पाण्यावर एका अर्भकाचा मृतदेह तरंगत असल्याचे येथील नागरिकांना दिसले. त्यानंतर त्यांनी शिक्रापूर पोलिसांना याबाबत माहिती दिली असता शिक्रापूर पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी करत पंचनामा करून सदर मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी सदर मृतदेहाबाबत आजुबाजूला चौकशी केली असता काहीही माहिती मिळू शकली नाही. याबाबत नीलेश रामदास गव्हाणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे हे करत आहे.
कोरेगाव भीमा येथे नदीत मृतावस्थेत अर्भक आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 20:05 IST