शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अपात्र लाडक्या बहिणींनी पडताळणीनंतर पैसे केले परत, पडताळणी सुरूच राहणार

By नितीन चौधरी | Updated: November 29, 2024 17:35 IST

आचारसंहितेच्या काळात उर्वरित अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे

पुणे : संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांवर भुरळ घालणाऱ्या 'लाडकी बहीण' योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरूच असून आतापर्यंत अनेक अपात्र लाभार्थ्यांनी आपले पैसेदेखील परत केले आहेत. पडताळणीची प्रक्रिया निरंतर सुरू असून अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी दिली.

दरम्यान, आचारसंहितेच्या काळात उर्वरित अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्याशिवाय येत्या काही दिवसांत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली जाणार असून लवकरच पुढील हप्ताही देण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीपर्यंत राज्यात २ कोटी ५२ लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते. तर पुणे जिल्ह्यात २० लाख ४८ हजारांहून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले होते. योजनेला १५ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत होती. तर १६ ऑक्टोबरला आचारसंहिता जारी झाल्यामुळे नव्याने आलेल्या अर्जांची छाननी आणि मंजुरीची प्रक्रिया होऊ शकली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे एक लाखांहून अधिक अर्ज आचारसंहितेत अडकले होते.

मात्र, त्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने ५० हजार अर्जांची छाननी करून त्याला मान्यताही दिली. याबाबत महिला व बालकल्याण विभागाची बुधवारी (दि. २७) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. त्या वेळी महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी अधिकाऱ्यांशी विविध मुद्यांवर चर्चा केली.

टॅग्स :Puneपुणेladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाMahayutiमहायुतीAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस