शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील इंद्रायणी मेडिसिटी ६ महिन्यांपूर्वीच मंजूर; बजेटमध्ये आता उल्लेख, प्रकल्पाला गती मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 21:15 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहा महिन्यांपूर्वीच मेडिसिटीचा विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्यास परवानगी दिली असून, या संदर्भात जिल्हा परिषदेच्या वतीने राज्य शासन व आरोग्य विभागाला सादरीकरण करण्यात आले आहे

पुणे : ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना विविध प्रकारच्या आजारांचे अद्ययावत उपचार एकाच छताखाली देण्यासाठी गुडगाव- दिल्ली, कर्नाटक, अहमदाबादच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रासाठी पहिली 'इंद्रायणी मेडिसिटी' उभारण्यात येणार आहे. या अंतर्गत सुमारे पाचशे एकरहून अधिक जागेत विविध प्रकारच्या आजारांसाठी २४ विभागांच्या स्वतंत्र इमारती निर्माण केल्या जाणार असून, जिल्ह्यातील खेड लोकसभा मतदार संघात हा प्रकल्प प्रस्तावित आहे. परंतु राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा केवळ उल्लेख केला असून, प्रत्यक्ष तरतूद मात्र करण्यात आली नाही. जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने हा आराखडा तयार करण्यात आला असून,  कागदावरच असलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यासाठी आणखी किती वर्षे लागणार हे मात्र आता सांगणे कठीण आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहा महिन्यांपूर्वीच मेडिसिटीचा विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्यास परवानगी दिली असून, या संदर्भात जिल्हा परिषदेच्या वतीने राज्य शासन व आरोग्य विभागाला सादरीकरण करण्यात आले आहे. आता शासनाच्या अर्थसंकल्पात यांचा उल्लेख करण्यात आल्याने प्रकल्पाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

असा असेल इंद्रायणी मिडिसिटी प्रकल्प 

- एकाच ठिकाणी १० ते १५ हजार खाटांची सुविधा उपलब्ध - तब्बल 500 एकर जागेत मेडिसिटी प्रकल्प - या प्रकल्पात ट्रॉमा क्रिटिकल, हृदयरोग, मूत्रपिंड, मेंदूरोग, दंतचिकित्सा, बालरोग, नेत्ररोग, एंडोक्रायनोलॉजी, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, मूत्ररोग, हिमॅटोलॉजी, अवयव प्रत्यारोपण, आयूष जनरल रुग्णालय, मानसिक पुनर्वसन केंद्र, स्त्रीरोग, रेडिओलॉजी, पुनर्वसन केंद्र, स्पोर्ट्स मेडिसीन, कॅन्सर तब्बल 24  स्वतंत्र रुग्णालयांचा समावेश असेल.-  संशोधनाला चालना देण्यासाठी क्लिनिकल रिसर्च सेंटर, जेनेटिक मेडिसीन रिसर्च सेंटर, ओबेसिटी अँड डाएट मॅनेजमेंट, जीन्स बँक, रक्तपेढी, मेडिकल लायब्ररी डेटा सेंटर, स्टेम सेल अशा रुग्णालयांशी अन्य परस्परपूरक संस्थाही असणार - पीएमआरडीए'कडे असणार प्रकल्प उभारणीची जबाबदारी

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारBudgetअर्थसंकल्प 2022Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी