शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
3
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
4
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
5
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
6
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
7
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
8
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
9
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
10
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
11
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
12
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
13
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
14
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
15
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
16
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
17
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
18
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

Pune Crime: चाकण परिसरात बेधुंद फायरिंग; रासे फाट्यावरील 'हॉटेल मराठा'मधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 14:19 IST

ही घटना खेड तालुक्यातील रासे फाटा येथील हॉटेल मराठा येथे घडली आहे....

चाकण (पुणे) : खुनातील आरोपींना मदत केल्याच्या कारणावरून चार जणांच्या टोळक्याने (दि.१८ ) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सराईत गुन्हेगारावर बेधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना खेड तालुक्यातील रासे फाटा येथील हॉटेल मराठा येथे घडली आहे.

स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे (रा.रासे,ता.खेड,जि. पुणे ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल पवार (रा.महाळुंगे,ता खेड); अजय गायकवाड (रा.महाळुंगे,ता खेड ) आणि  दोन अनोळखी इसमांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून, यातील अजय गायकवाड याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण - शिक्रापूर मार्गावरील रासे फाटा ( ता.खेड ) येथील मराठा हॉटेल येथे स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे यांचेवर पिस्तुलमधून फायरिंग करण्यात आल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. घटनास्थळी जात पोलिसांनी माहिती घेतली असता, फिर्यादी हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर फायर झाले होते. राहुल पवार याचा लहान भाऊ रितेश पवार (रा. महाळुंगे ) याचा चार महिन्यापूर्वी खून झाला होता. त्या खुनातील आरोपींना सोप्या शिंदे ह्याने मदत केली असून त्यांना सहकार्य केले असल्याची माहितीवरून आरोपींनी सोप्या शिंदेवर दोन फायर केली. त्यामुळे त्याच्या डोक्यास किरकोळ जखम झाली आहे. घटनेनंतर एकास अटक करण्यात आली असून इतर फरारी आरोपींच्या शोधासाठी चाकण पोलिसांच्या टीम रवाना करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी