पुणे : इंडिगो कंपनीने गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये ज्या तांत्रिक गोष्टी करणे आवश्यक होते, त्या त्यांनी वेळेत केल्या नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, याबाबत हवाई वाहतूक मंत्रालयाने तत्काळ दखल घेऊन इंडिगोला ही सगळी व्यवस्था पुन्हा लावण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे त्यांना जे बदल करण्याचा नियम लागू करण्यात आला होता. त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. तसेच या नियमाला फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे. याबाबत चौकशी समिती देखील गठित केली असून, ‘इंडिगो’च्या सीईओंना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे, असे केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुरलीधर मोहाेळ म्हणाले, अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर पायलट असोसिएशनने पायलटांच्या ड्युटीचे तास हे १० वरून ८ तासांवर आणावेत, अशी मागणी केली होती. त्यानुसार दिल्ली उच्च न्यायालयाने त्याबाबतचे निर्देश देखील दिले होते. त्यानंतर डीजीसीएने सर्व विमान कंपन्यांना तत्काळ आदेश दिले होते. पायलट यांची ड्युटीची वेळ आठ तास करण्यात यावी. त्यासाठी दोन टप्पेदेखील या विमान वाहतूक कंपन्यांना आखून देण्यात आले होते. मात्र शेवटच्या दिवसापर्यंत इंडिगोने या संदर्भात कोणतेही काम केले नाही. त्यामुळे अचानकपणे पायलटचे ड्युटीचे तास कमी झाले आणि त्यामध्ये आधीच मनुष्यबळाची असलेली कमतरता, यामुळे इंडिगोची वाहतूक सेवा विस्कळीत झाली. इंडिगो ही देशातील ६५ टक्के विमान वाहतूक सेवा पुरवत असल्याने हा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवला.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/24417467241263027/}}}}
कठोर कारवाई करणार
अन्य विमान कंपन्यांनी वाढवलेल्या तिकीट दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंतरानुसार जास्तीत जास्त किती दर आकारला जाऊ शकतो याबाबतचे नियम करण्यात आले आहेत. तसेच ज्या लोकांची विमाने रद्द झाली आहेत. त्यांना कोणतेही कॅन्सलेशन चार्जेस न लावता पूर्ण तिकिटाची रक्कम पुढील ४८ तासांमध्ये देण्यात यावी. तिकीट दर अधिक घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करू, असे आश्वासन केंद्रीय विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
Web Summary : Indigo faces scrutiny for delayed technical updates, causing flight disruptions. An inquiry committee is formed, and the CEO receives a notice. Ticket price hikes will be monitored, and full refunds are mandated for cancelled flights.
Web Summary : इंडिगो को तकनीकी अपडेट में देरी के कारण उड़ान में व्यवधान का सामना करना पड़ रहा है। जांच समिति का गठन, सीईओ को नोटिस। टिकट मूल्य वृद्धि की निगरानी की जाएगी, रद्द उड़ानों के लिए पूरा धनवापसी अनिवार्य है।