इंडियाना कंपनीतील संप अखेर मागे
By Admin | Updated: November 28, 2014 23:12 IST2014-11-28T23:12:04+5:302014-11-28T23:12:04+5:30
जेजुरी औद्योगिक वसाहतीतील इंडियाना ग्रेटिंग्ज कंपनीतील कामगारांचा गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेला संप काल तोडगा निघल्याने मागे घेण्यात आला.

इंडियाना कंपनीतील संप अखेर मागे
जेजुरी : जेजुरी औद्योगिक वसाहतीतील इंडियाना ग्रेटिंग्ज कंपनीतील कामगारांचा गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेला संप काल तोडगा निघल्याने मागे घेण्यात आला. आजपासूनच कामगार कामावर हजर झाले होते. आंदोलक कामगारांनी कंपनीमालक, प्रशासन, पत्रकार, कामगार प्रतिनिधी, तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना आदींनी केलेल्या सहकार्याबद्दल विशेष आभार मानले.
कंपनीतील 14क् कामगारांनी वेतनवाढ व विविध मागण्यांसाठी व्यवस्थापनाविरोधात ‘काम बंद आंदोलन’ गेल्या 9 दिवसांपासून औद्योगिक वसाहतीतील मुख्य शिवाजी चौकात सुरू केले होते. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मनसे कामगार युनियन, कामगार प्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, काँग्रेस, शिवसेना संभाजी ब्रिगेड, सामाजिक संघटना, स्थानिक प्रतिनिधी बापू भोर, तसेच जेजुरी पोलीस प्रशासन संप मागे घ्यावा व कामगारांना न्याय मिळावा म्हणून कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करीत मध्यस्थी केली होती.
कामगारांच्या इतर मागण्या संप मागे घेतल्यानंतर टप्प्या-टप्प्याने पूर्ण करण्याचे धोरण व्यवस्थापनाने मान्य केले. या निर्णयानुसार कामगारांनी
संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असून, आजपासून ते कामावर हजर झाले. (वार्ताहर)