शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railway | रेल्वे तिकीट कॅन्सल करणे पडले साडेतीन लाखांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 17:40 IST

६९ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली...

पुणे : रेल्वेचे तिकीट कॅन्सल करण्यासाठी त्यांनी गुगलवर सर्च केले. तिकीट रद्द करण्यासाठी त्यांनी वेबसाइट उघडली; परंतु ती आरआरसीटीसी बेवसाइट सायबर चोरट्यांची असल्याने तिकीट कॅन्सल होण्याऐवजी बँक खात्यातून साडेतीन लाख रुपयांवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला. याबाबत औंधमधील एका ६९ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २३ जानेवारी २०२३ रोजी घडला.

याबाबतची माहिती अशी, फिर्यादी यांनी रेल्वेचे तिकीट आयआरसीटीसीवरून बुक केले होते; परंतु त्यानंतर त्यांचा प्रवासाचा बेत रद्द झाला. त्यांनी रेल्वेचे तिकीट कॅन्सल करण्यासाठी मोबाइलवरून गुगलवर सर्च केले. तेव्हा त्यांना आयआरसीटीसीच्या अनेक वेबसाइट आढळून आल्या. त्यापैकी एक साइट त्यांनी उघडली. ती नेमकी सायबर चोरट्यांची होती. त्यांनी साइट उघडताच त्यांना सायबर चोरट्यांचा फोन आला. त्यांची चौकशी त्यांच्याकडून पीएनआयआर नंबर घेतला. त्यांच्या तिकिटांची माहिती सांगितली. त्यानंतर त्यांनी तिकीट कॅन्सल करण्यासाठी एक लिंक पाठवली व ती भरून पाठविण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी फॉर्म भरून पाठविला.

तेव्हा त्यांना तुमचे पैसे खात्यात जमा झाले आहेत, तपासून पाहा, असे सांगितले. तेव्हा त्यांनी बँक खाते उघडून पाहिले तर खात्यात पैसे जमा झाले नव्हते. तेव्हा सायबर चोरट्याने त्यांना काही वेळात पैसे जमा होतील, असे सांगितले. तेवढ्यात त्यांना स्टेट बँकेतून फोन आला, तुम्ही १ लाख रुपयांचे व्यवहार केले आहेत का? अशी चौकशी केली. त्यांनी नाही असे सांगितले. तेव्हा बँक कर्मचाऱ्याने हा सायबर फ्रॉड असून तुमचे इंटरनेट बँकिंग बंद करतो. तुम्ही बँकेत तक्रार करा. तोपर्यंत सायबर चोरट्यांनी त्यांच्या ३ खात्यातून ३ लाख ४४ हजार रुपये काढून घेतले. पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामणी अधिक तपास करीत आहेत.

आयआरटीसीटी यांची एकच वेबसाइट आहे. त्यावरच तिकीट आरक्षित अथवा रद्द करता येते. आयआरटीसीटीकडून कोणताही फोन येत नाही. तसेच ते कोणतीही लिंक पाठवत नाही. तिकीट रद्द केल्यानंतर त्याचे पैसे लगेच येत नाही, तर सात दिवसांच्या कालावधीत तुमच्या खात्यात येतात. आयआरटीसीटीसारख्या कंपन्यांनी त्यांच्या कंपनीसारख्यांनी आपल्यासारख्या वेबसाइट गुगलवर असतील तर त्यावर लक्ष ठेवून त्या काढून टाकल्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, जेणेकरून लोकांची फसवणूक होणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी