भारतीय खेळाडूंनी इतर देशांमध्ये होणा-या लीगमध्ये सहभागी व्हायला हवे : ख्रिस गेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 07:38 PM2018-05-22T19:38:10+5:302018-05-22T19:38:10+5:30

पुण्याच्या ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालयाला क्रिकेटर ख्रिस गेल याने भेट दिली, यावेळी त्याने क्रिकेट शिकणाऱ्या मुलींना काही टिप्स दिल्या.

Indian players should play in other countrys league : Chris Gayle | भारतीय खेळाडूंनी इतर देशांमध्ये होणा-या लीगमध्ये सहभागी व्हायला हवे : ख्रिस गेल

भारतीय खेळाडूंनी इतर देशांमध्ये होणा-या लीगमध्ये सहभागी व्हायला हवे : ख्रिस गेल

Next

पुणे : आयपीएल ही जगातील सर्वोत्तम क्रिकेट लीग असली तरी भारतीय खेळाडूंनी इतर देशांमध्ये होणा-या लीगमध्ये सहभागी व्हायला हवे, असे मत वेस्ट इंडीजचा धडाकेबाज क्रिकेटर ख्रिस गेल याने व्यक्त केले. पुण्यातील ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालयाला अाज त्याने दुसऱ्यांदा भेट दिली त्यावेळी ताे बाेलत हाेता. गेलने यंदाच्या आयपीएल मोसमात शतक झळकावलेली बॅट व किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची जर्सी संग्रहालयाकरीता संग्रहालयाचे संस्थापक रोहन पाटे यांच्याकडे सुपूर्त केली. याआधी त्याचा सहभाग असलेल्या टी २० विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडीज संघाची जर्सी देखील संग्रहालयाला दिली होती.
    
पाटे यांच्या पुढाकाराने पुण्यातील क्रिकेट शिकणा-या मुलींना थेट ख्रिस गेलशी संवाद साधण्याची संधी मिळाली. संग्रहालयात ख्रिसने या मुलींना बॅट पकडण्याच्या तंत्राविषयी टिप्स दिल्या तसेच त्यांच्या मनातील क्रिकेट विषयक काही शंकाचे निरसन देखील केले.यंदाच्या मोसमात आयपीएल कोण जिंकणार असे विचारले असता गेल म्हणाला प्ले ऑफ साठी पात्र ठरलेले सर्वच संघ हे चांगल्या फॉर्मात असल्याने कोणता संघ आयपीएल जिंकेल याचा अंदाज वर्तविणे अशक्य आहे. तो पुढे म्हणाला की यंदाच्या आयपीएल मोसमात कित्येक सामान्यांचा निकाल हा सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर लागला अशा प्रकारची चुरस असताना कोण जिंकेल हा अंदाज वर्तवने अशक्य आहे.

फुटबॉलपटू रोनाल्डोचा चाहता असलेल्या ख्रिस गेलला त्याच्या विषयी प्रश्न विचारला असता रोनाल्डो येत्या फुटबॉल विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी करून आपल्या संघाला विश्वचषक जिंकून देईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

Web Title: Indian players should play in other countrys league : Chris Gayle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.