शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सातासमुद्रापार ढोल - ताशांचा निनाद; दुबईत स्थापन झाले बालगोपाळांचे पहिले ढोल ताशा पथक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 17:46 IST

बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेला या बालमित्र पथकाने हजारो गणेश भक्तांच्या समोर ढोल ताशा वादनाचे सादरीकरण करून दुबईकरांची मने जिंकली

भानुदास पऱ्हाड 

आळंदी : सातासमुद्रापार दुबई देशात बालगोपाळांचे पहिले ढोल- ताशा पथक स्थापन करण्यात आले आहे. आखाती देशात त्रिविक्रम ढोल ताशा पथक नावाने सुरु झालेले हे पहिले व एकमेव पारंपारिक ढोल ताशा पथक आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या वादन परंपरेचा प्रसार करण्याचे कार्य मंडळाच्या माध्यमातून सुरू आहे.             दुबईत ढोल ताशा पथकाची स्थापना सागर पाटील यांनी सन २०१७ मध्ये केली आहे. महाराष्ट्राचा आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ढोल ताशा संस्कृतीचा प्रचार या पथकाच्या माध्यमातून केला जात आहे. याबद्दल या पथकाला महाराष्ट्र शासनाने खास ''''मराठी भाषा सन्मान'''' देऊन गौरविले आहे.

दरम्यान या पथकाचे १५० प्रयोग पूर्ण केले आहेत. मात्र ढोल ताशा संस्कृतीचा वारसा नवीन पिढीला सोपवण्यासाठी या पथकाने खास लहान मुलांकरिता नविन पथक सुरू केले आहे. त्रिविक्रम बालमित्र ढोल ताशा पथक दुबई असे या पथकाचे नाव ठेवण्यात आले असून यामध्ये सहा ते १४ वर्षाच्या मुला - मुलींचा सहभाग ठेवण्यात आला आहे. या लहान मुलांना ढोल, ताशा, लेझीम, ध्वज, झांज या वाद्यांची ओळख करून त्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात येत आहे.

मराठमोळी संस्कृतीचे जतन...

अबुधाबी येथे मंगळवारी (दि.१९) बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठा दिनी या बालमित्र पथकाने हजारो गणेश भक्तांच्या समोर ढोल ताशा वादनाचे सादरीकरण करून दुबईकरांची मने जिंकली. पथकाचे नेतृत्व सागर पाटील करत असून पुषन पाटील, काव्या सांगले, हेतवी जोशी, ओम इरवाडकर, ईश्वरी इरवाडकर, अनय पाटील, विनय पाटील, अन्विता सावंत, आदि पाटील, विनंती हसबे, साक्षी हसबे, भाग्या गावडे, आरुष कर्वे आदीं चिमुकले पथकात सहभागी झाले आहेत. सातासमुद्रापार मराठमोळी संस्कृती जपण्याच्या कार्यात हातभार लावण्याचे कार्य हे बालमित्र मंडळी करत आहेत.

''परदेशात वाढणाऱ्या मुलांना आपल्या महाराष्ट्राच्या कला व संस्कृतीची जाणीव असावी व त्याची ओढ लागावी म्हणून या पथकाची स्थापना केली आहे. आगामी काळात आखाती देशातही ही मुले आपली कला जिवंत ठेवतील. - सागर पाटील, संस्थापक त्रिविक्रम बालमित्र ढोल ताशा पथक''

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवganpatiगणपतीmusicसंगीतSocialसामाजिकDubaiदुबई