शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भारताला नक्कीच ऑलिम्पिक पदक मिळवून देणार; अपंगत्वावर मात करून आरतीचा संघर्षमय प्रवास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 15:05 IST

जागतिक क्रमवारीत १६ व्या क्रमांकावर असलेल्या आरतीसमोर जगभरातील प्रतिस्पर्ध्यांसोबतच हलाखीच्या परिस्थितीचे आव्हान आहे. दिवसातील सहा-सात तास सराव करणाऱ्या आरतीला ऑलिम्पिक स्वप्न साकारण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे

पुणे : लहानपणापासूनच एक हात नसतानाही पॅरा बॅडमिंटनपटू आरती जानोबा पाटील भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याचे स्वप्न उराशी बाळगून संघर्ष करत आहे. जागतिक क्रमवारीत १६ व्या क्रमांकावर असलेल्या आरतीसमोर जगभरातील प्रतिस्पर्ध्यांसोबतच हलाखीच्या परिस्थितीचे आव्हान आहे. दिवसातील सहा-सात तास सराव करणाऱ्या आरतीला ऑलिम्पिक स्वप्न साकारण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.

आज (३ डिसेंबर) जागतिक अपंग दिन. जन्मापासूनच मिळालेल्या अपंगत्वाचा कोणताही न्यूनगंड न बाळगता आरतीला लहानपणापासूनच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची आवड होती. रांगोळी तसेच मैदानी स्पर्धांमध्ये ती आवडीने भाग घ्यायची. कोल्हापूरसारख्या क्रीडानगरीत उचगाव (ता. करवीर) येथे तिने शालेय, तालुका, जिल्हा पातळीवरही मैदानी स्पर्धांमध्ये तिने अनेक पदकांची कमाई केली. मैदानी खेळात २००८मध्ये दुखापत झाल्यानंतर आरतीला एका प्रशिक्षकांनी बॅडमिंटन खेळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर २००९ पासून तिने बॅडमिंटनचा सराव सुरू केला आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही.

२०११मध्ये तिने राष्ट्रीय पातळीवर पहिल्या पदकाची कमाई करत आई-वडिलांचा विश्वास सार्थ ठरविला. प्रचंड जिद्दीच्या जोरावर २५ वर्षांची आरती आजपर्यंत १५ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहे.

२०१७मध्ये तिने जपानमध्ये पहिले आंतरराष्ट्रीय पदक पटकावले. आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने शानदार कामगिरी करूनही तिला अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांना मुकावे लागले आणि त्यामुळे पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची तिची संधी हुकली.

आरती आतापर्यंत दुबई, ब्राझील, पेरू, युगांडा, स्वित्झर्लंड, जपान यांसारख्या अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहे. आरतीचे वडील व लहान भाऊ गवंडी काम करतात. तिला एक मोठी विवाहित आणि एक लहान बहीण आहे. त्यामुळे घरची परिस्थिती जेमतेम. मात्र, या परिस्थितीपुढे न झुकता तिच्या आईवडिलांनी मुलीसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धांची कवाडे खुली केली. आता २०२४मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी आरतीला अधिकाधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे. मात्र, त्यासाठी तिला आर्थिक मदतीची गरज आहे. आतापर्यंतचा प्रवास तिने जिद्दीने पूर्ण केला आहे. भविष्यात देशासाठी ऐतिहासिक कामगिरी करण्याचा विश्वास तिने व्यक्त केला आहे.

आहारासाठी दरमहा ३० हजार खर्च

खेळासाठी तंदुरुस्ती आणि आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना आहाराकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आहारासाठी दरमहा ३० हजार रुपये खर्च करावा लागतो. आतापर्यंत वडिलांनी कर्ज घेऊन हा खर्च भागवला आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावी कामगिरी करता आली.

देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न

''पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी माझ्या आईवडिलांकडे अजिबात पैसे नव्हते. तेव्हा आईने मंगळसूत्र मोडून, बचतगटाच्या मदतीने माझ्या तिकिटाचे पैसे गोळा केले होते. आता आहार, तंदुरुस्ती असा खर्च आणखी वाढला आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याबरोबरच देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न डोळ्यांसमोर आहे असे आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटनपटू आरती पाटील हिने सांगितले.''  

टॅग्स :PuneपुणेBadmintonBadmintonIndiaभारतSocialसामाजिक