शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

"इंडिया, इंडिया... भारत माता की जय!" विश्वचषक ट्राॅफीचे पुणेकरांनी केले जल्लोषात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 16:58 IST

इतिहासात पहिल्यांदाच रॅलीच्या माध्यमातून पुणेकरांना विश्वचषक ट्राॅफी जवळून अनुभवता आली...

- उमेश जाधव

पुणे : cricket world cup 2023- ढोल ताशांचा गजर, भर पावसात तरुणाईने इंडिया, इंडियाच्या घोषणा देत केलेला जल्लोष, नवोदित खेळाडूंची गर्दी अशा अत्यंत उत्साही वातावरणात पुणेकरांनी मंगळवारी आयसीसी क्रिकेट विश्वचषक ट्राॅफीचे जोरदार स्वागत केले. इतिहासात पहिल्यांदाच रॅलीच्या माध्यमातून पुणेकरांना विश्वचषक ट्राॅफी जवळून अनुभवता आली.

पुणे शहरात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियम गहुंजे येथे आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे पाच सामने खेळविण्यात येणार आहेत. १९ ऑक्टोबरला पुण्यात विश्वचषक स्पर्धेतील भारत-बांगलादेश हा पहिला सामना रंगणार आहे. त्यानंतर चार सामने याच मैदानावर खेळवण्यात येतील. त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्या मान्यतेने   महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने पुणेकरांना ही ट्राॅफी पाहता यावी यासाठी जेडब्ल्यू मेरिएट हाॅटेल ते कृषि महाविद्यालय अशी या ट्राॅफीची मिरवणूक काढण्यात आली.महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले की, यंदाची विश्वचषक स्पर्धेतील पाच सामने पुण्यात होत आहेत. त्यामुळे पुढील एक ते दीड महिना सगळीकडे क्रिकेटमय वातावरण असणार आहे. या स्पर्धेत सर्वसामान्य पुणेकरांना सामावून घेण्यासाठी विश्वचषक रॅलीचे आयोजन करण्यात आले. आयसीसी-बीसीसीआयकडे आग्रह केल्यानंतर पुण्याला विश्वचषकाच्या ट्राॅफीची रॅली काढण्यास परवानगी मिळाली. प्रत्येक पुणेकराला विश्वचषक पाहता यावा, त्यासोबत छायाचित्र घेता यावे हा या रॅलीचा उद्देश होता.

विश्वचषक

मंगळवारी सिम्बायोसिस महाविद्यालय, बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय अशी विश्वचषक ट्राॅफीची रॅली काढण्यात आली. यावेळी महाविद्यालयीन तरुणाई रस्त्यावर उतरल्यामुळे प्रचंड उत्साही वातावरण होते. नवोदित क्रिकेटपटू दुपारी बारा वाजल्यापासून रस्त्यावर होते. फर्ग्युसन महाविद्यालयाजवळ प्रचंड पाऊस असतानाही तरुणाईने पावसात ट्राॅफीचे स्वागत केले.

  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेICCआयसीसीRohit Pawarरोहित पवार