शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांच्या सुरक्षेसाठी पोलीसांचा स्वतंत्र इंडस्ट्रियल सेल :पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 21:01 IST

औद्योगिक पट्ट्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र ‘इंडस्ट्रियल सेल’ कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे औद्योगिक पट्ट्यात उद्योजक व कामगारांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

हनुमंत देवकर चाकण : औद्योगिक पट्ट्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र ‘इंडस्ट्रियल सेल’ कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे औद्योगिक पट्ट्यात उद्योजक व कामगारांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.         उद्योगनगरी म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आहे. भोसरी, चिंचवडसह आयुक्तालयांतर्गत असलेल्या चाकण, तळेगाव दाभाडे या भागातील औद्योगिक पट्ट्यात अनेक छोटे-मोठे उद्योग असून, यामुळे लाखो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र, येथील उद्योजकांना माथाडीच्या नावाखाली धमकावणे, खंडणी वसूल करणे, ठेकेदारी मिळविण्यासाठी दहशत निर्माण करणे, कामगारांची लूटमार करणे, असे प्रकार वारंवार घडतात. यापूर्वीही काही गंभीर घटना घडल्या आहेत. अशा प्रकारची गुन्हेगारी कमी करण्यासह औद्योगिक पट्ट्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी उद्योजकांसह कामगार संघटना यांनी वारंवार पोलिसांकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे दिवसेंदिवस वाढत असलेले हे प्रकार रोखण्यासाठी आयुक्तालयात आता ‘इंडस्ट्रियल सेल’ कार्यान्वित करण्यात आला आहे. या सेलसाठी एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, वीस कर्मचारी नियुक्त केले आहेत. या सेलकडून उद्योजक, कामगारांशी संबंधित तक्रारींचे निवारण केले जाणार आहे. पिंपरी-चिंचवड एमआयडीसीसह चाकण, तळेगाव दाभाडे, आंबी या एमआयडीसीचाही समावेश आहे. यापूर्वी यातील एखाद्या घटनेसंदर्भात स्थानिक पोलीस ठाण्याकडून तपास केला जात होता. आता मात्र पोलीस ठाण्यासह या इंडस्ट्रियल सेलकडूनही समांतर तपास होणार आहे.   आर. आर. पाटील (सहायक पोलीस आयुक्त)  :‘औद्योगिक पट्ट्यात उद्योजकांना, कामगारांना धमकाविण्याच्या घटना वाढल्या आहेत. याबाबत उद्योजकांकडून तक्रारी आल्या होत्या. त्यादृष्टीने हा सेल काम करेल.  

टॅग्स :ChakanचाकणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस