शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

२५ वर्षांपासून वीजबिलाच्या थकबाकीत अडकलेली इंदापूर नगर परिषद मुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 13:48 IST

इंदापूर नगरपरिषदेकडे पाणीपुरवठा विभागाचे १ कोटी ७२ लाख ३५ हजार ७२२ रुपये व दिवाबत्ती विभागाचे १ कोटी ७४ लाख ६१ हजार ८८३ रुपये असे एकूण ३ कोटी ४६ लाख ९७ हजार ६०५ रुपये थकीत वीजबिल होते..

ठळक मुद्देथकीत बिल अखेर भरले : शेवटचा हप्ता ८ लाख ११ हजार रुपयांचावीजबिल भरण्यासाठी वीज पुरवठा विभागाकडे एकूण ४० हप्त्यांची केली होती मागणी

इंदापूर  :  नगर परिषदेकडे मागील २५ वर्षांपासून वीजबिल थकीत होते. त्यातील शेवटचा हप्ता ८ लाख ११ हजार रुपये वीज वितरण विभागास अदा करून सर्व थकीत वीजबिलामधून इंदापूर नगर परिषद मुक्त झाली आहे, अशी माहिती अंकिता शहा आणि मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी दिली.नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की, इंदापूर नगरपरिषदेकडे पाणीपुरवठा विभागाचे १ कोटी ७२ लाख ३५ हजार ७२२ रुपये व दिवाबत्ती विभागाचे १ कोटी ७४ लाख ६१ हजार ८८३ रुपये असे एकूण ३ कोटी ४६ लाख ९७ हजार ६०५ रुपये थकीत वीजबिल होते. गेल्या २५ वर्षांपासून हा प्रश्न निर्माण झाला होता. डिसेंबर २०१७ मध्ये नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा व पदपथावरील वीजपुरवठा बोर्डाने खंडित केला होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी नगरपालिकेच्या शिष्टमंडळाने ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्यासोबत या विषयी मार्ग काढण्यासाठी बोलणी केली. इंदापूर नगर परिषदेने सदर थकीत वीजबिल भरण्यासाठी वीज पुरवठा विभागाकडे एकूण ४० हप्त्यांची मागणी केली होती. दरम्यानच्या काळात ऊर्जामंत्री व प्रधान सचिव यांच्याशी चर्चा करून पंधरा समान हप्त्यांत वीजबिल भरण्याचे ठरले. नगरपालिकेने प्राधान्याने दर महिन्याला हप्तेफेड करीत वीज देयकातील शेवटची ८ लाख ११ हजार रुपये रक्कम एम.एस.ई.डी.सी.एल.ला भरून इंदापूर नगर परिषद या थकीत वीजबिलातून मुक्त झाली. कायमस्वरूपी हा प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य देऊन नियोजन केले. न्यायालयात याविषयी दाद मागितली. सरकारी व प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला. सर्व नगरसेवक, कर्मचारी तसेच नागरिकांच्या सहकार्याने हा प्रश्न सोडवण्यास नगरपरिषदेस यश मिळाले. नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगर परिषदेस धन्यवाद दिले. हा प्रश्न सुटल्याने नगरपालिकेला आपल्या उत्पन्नाचे विकासात्मक नियोजनास संधी मिळणार आहे............मागील २५ वर्षांतील संबंधितांवर कारवाईची मागणीइंदापूर नगर परिषदेमध्ये मागील २५ वर्षांत जवळपास  ८ नगराध्यक्ष झाले असतील. नगरपालिकेमध्ये मागील २५ वर्षांत गोरगरीब जनतेकडून कराच्या रुपात जमा झालेले महसूल व शासनाकडून मिळालेल्या अनुदानाची रकमेचा विचार केला तर हजारो कोटी रुपयांची उलाढाल झाली असेल. मग त्या आठ नगराध्यक्षांनी दिवाबत्ती बिल व पाणीपुरवठा वीज बिलाचा प्रश्न का सोडवला नाही? आणि वीज वितरण कंपनीने २५ वर्षे बिल न भरता, नगरपालिकेला फुकट वीज कशी पुरवली? याबाबत नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात असून, संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :Indapurइंदापूरmahavitaranमहावितरण