शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरात कोयत्याच्या धाकाने दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या अट्टल गुन्हेगारासह चार आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 17:46 IST

इंदापूर पोलिसांच्या दक्षतेमुळे आरोपी दोन तासात जेरबंद.

ठळक मुद्देआरोपींना १८ मे पर्यंत पोलीस कोठडी

बाभुळगाव: इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या वेळी दुचाकीस्वाराच्या मोटरसायकल समोर कार आडवी लावली. त्यानंतर कोयत्याच्या धाकाने पाच अनोळखी व्यक्तींनी दुचाकीस्वाराकडील रोख रक्कम व मोबाईल लुटून फरार झाल्याची घटना घडली होती. याबाबत विकास बबन शिंदे रा आडसूळवाडी यांनी इंदापूरपोलिसात फिर्याद दिली. या घटनेचे गांभीर्य पाहून इंदापूर पोलिसांनी अवघ्या दोन तासात एका अट्टल गुन्हेगारासह चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींना इंदापूर न्यायालयात हजर केल्यावर १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती इंदापूर पोलिसांनी दिली.

राहुल बाळासाहेब पवार.(वय२२) , दिनेश उर्फ मयुर महेंद्र दाईंजे (वय २०), विवेक पांडुरंग शिंदे (वय २०), सागर नेताजी बाबर (वय १९) सर्व रा. इंदापूर रा. अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून एक आरोपी फरार आहे.

 विकास शिंदे हे आजारी असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पुण्यावरून आडसुळवाडी येथे चालले होते. गुरुवारी पहाटे ५:३० वाजता सरडेवाडी टोल नाका पास केल्यावर सोनाई पेट्रोल पंपाजवळ कारने त्यांना अडवले. गाडीतून उतरलेल्या पाच अनोळखी व्यक्तींनी शिंदे यांना मारहाण केली. व कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून ३ हजार रूपये, मोबाईल असा एकूण ४ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. इंदापूर पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची सुत्रे हलवली.  हिंगणगाव येथे गोकुळ हाॅटेलजवळ सापळा रचून अवघ्या दोन तासात चार आरोपीना ताब्यात घेतले.  पुढील तपास पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर धनवे हे करत आहेत. 

राहुल पवार याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद

आरोपी राहुल बाळासाहेब पवार याच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर कडक कारवाईची मागणी होत आहे. त्याच्यावर इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत कलम ३०७ अन्वये दोन गुन्हे दाखल आहेत. कलम ३९५ अन्वये तीन गुन्हे दाखल झाले असून इंदापूर पोलीस स्टेशनअंतर्गत एकुण ५ गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसIndapurइंदापूरArrestअटक