इंदापूरला ८ दरोडेखोरांवर मोक्का

By Admin | Updated: August 28, 2016 05:20 IST2016-08-28T05:20:50+5:302016-08-28T05:20:50+5:30

इंदापूर पोलीस ठाण्याअंतर्गत आठ दरोडेखोरांविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याची माहिती बारामती विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी बापू बांगर यांनी दिली.

Indapur 8 crackers | इंदापूरला ८ दरोडेखोरांवर मोक्का

इंदापूरला ८ दरोडेखोरांवर मोक्का

इंदापूर : इंदापूर पोलीस ठाण्याअंतर्गत आठ दरोडेखोरांविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याची माहिती बारामती विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी बापू बांगर यांनी दिली.
सोमनाथ विष्णू राऊत, धनाजी बबन मोरे, विकास नवनाथ
देवकर, रणजित चांगदेव गुराळकर, श्रीकांत नाना दरेकर, भानुदास
सुरेश जाधव अशी यातील ६ जणांची नावे आहेत.
आणखी दोघांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. यातील सोमनाथ राऊत टोळीप्रमुख आहे. बांगर म्हणाले, की कोल्हापूर परिक्षेत्राचे आय. जी. पी. विश्वास नांगरे-पाटील यांच्या पूर्वपरवानगीने पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव व अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
(वार्ताहर)

- या आरोपींनी इंदापूर, दौंड या जिल्ह्यातील तालुक्यात व नातेपुते, माळशिरस या सोलापूर जिल्ह्यातील परिसरात दरोडे, वाटमारी करणे, जबरी चोऱ्या करणे, धमक्या, खंडणी मागणे असे वेगवेगळे गुन्हे केल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. इंदापूर पोलीस ठाण्याअंतर्गत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये झालेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

Web Title: Indapur 8 crackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.