पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 11:16 AM2021-03-12T11:16:05+5:302021-03-12T11:16:40+5:30

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण आढळू लागले आहे.

Increasing prevalence of corona in Pune; What will Deputy Chief Minister Ajit Pawar decide? | पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेणार?

पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेणार?

googlenewsNext

पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांवर लॉकडाऊनची शक्यता जरी वर्तविण्यात येत नसेल तरी नव्याने काही निर्बंध लागणार का याबाबत आज (शुक्र.दि.१२) निर्णय होणार आहे.उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेमके कुठले पाऊल उचलणार आहे. याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना आढावा बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, महापौर हे उपस्थित आहे. या बैठकीत शहरातील सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय जाहीर करणार आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये पुणे जिल्हयात आणि राज्यांत रुग्णसंख्या वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचे संकेत दिले आहेत. पुण्यात काल एका दिवसातच १५०० च्या वर रुग्ण सापडले. नुकत्याच सादर केलेल्या पाहणी अहवालात हॉटेल, मॉल तसेच शाळा, कॉलेजमुळे संख्या वाढते आहे, असा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामुळे या आता काय निर्णय घेतला जाईल ते पाहावा लागणार आहे.

Web Title: Increasing prevalence of corona in Pune; What will Deputy Chief Minister Ajit Pawar decide?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.