शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सीएनजी दरवाढीने मोडणार ‘पीएमपी’चे कंबरडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 21:31 IST

डिझेल दरवाढीने आधीच मोठा बोजा पडत असताना आता पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) सीएनजी गॅस दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.

ठळक मुद्देमागील काही महिन्यांपासून वाढत असलेल्या डिझेल दरामुळे मोठा आर्थिक फटका संबंधित इंधन कंपनीकडून पीएमपीसाठी पंधरा दिवसांनी दर निश्चित

पुणे : डिझेल दरवाढीने आधीच मोठा बोजा पडत असताना आता पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) सीएनजी गॅस दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. हे दर शुक्रवार (दि. ५) पासून प्रतिकिलो तीन रुपयाने वाढणार असल्याने दररोज सुमारे दोन कोटी रुपयांचा भार पीएमपीवर पडणार आहे. दरम्यान, पीएमपीला मागील काही महिन्यांपासून वाढत असलेल्या डिझेल दरामुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. मागील महिनाभरात डिझेलचे दर सव्वा सहा रुपयांनी वाढले. त्यामुळे पीएमपीच्या तोट्यात वाढ झाली आहे. त्यातच आता सीएनजीचे दर वाढविण्याचा निर्णय संबंधित कंपनीने घेतला आहे. यापुर्वी पीएमपीला ५२ रुपये प्रति किलो दराने सीएनजी मिळत होता. गुरूवारपासून तीन रुपये दरवाढ झाल्याने ५५ रुपयाने मिळणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात सध्या एकुण १२२४ सीएनजीवर चालणाºया बस आहेत. त्यैपीक ५६४ बस पीएमपीच्या मालकीच्या तर उर्वरीत बस भाडेतत्वावरील आहेत. या सर्व बसला दररोज सुमारे ६२ हजार किलो गॅस लागतो. या गॅससाठी दररोज सुमारे ३२ लाख २४ हजार रुपये खर्च येत होता. दरवाढीमुळे त्यात सुमारे १ लाख ८६ हजार रुपयांची भर पडणार आहे.दरम्यान, डिझेलच्या दरात केंद्र सरकारने अडीच रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पीएमपीला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, कमी झालेल्या दराने डिझेल मिळण्यासाठी पीएमपीला काही दिवस वाट पाहावी लागेल अशी शक्यता आहे. संबंधित इंधन कंपनीकडून पीएमपीसाठी पंधरा दिवसांनी दर निश्चित केले जातात. तीन दिवसांपुर्वीच हा दर निश्चित झाला आहे. त्यामुळे आता आणखी दहा दिवसांनीच दर कमी होण्याची शक्यता असल्याचे समजते.------------------------- एकुण सीएनजी बसेसची संख्या - १२२४ ठेकेदार - ६६०पीएमपी - ५६४ दैनंदिन सीएनजी गरज- ६२ हजार किलोग्रॅम  दैनंदिन खर्च - ३२ लाख २४ हजार नव्या दरानुसार खर्च - ३४ लाख १० हजार अतिरीक्त भार - १ लाख ८६ हजार 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलDieselडिझेल