शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

देशात गर्भाशय काढण्याचं प्रमाण वाढलं; 'या' राज्यात तर भयानक स्वरूप उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:54 IST

-१०० पैकी दर ५ महिलांमध्ये काढण्यात येत आहे गर्भाशय

- अंबादास गवंडी पुणे : मासिक पाळीदरम्यान होणारा रस्तस्त्राव, आर्थिक समस्या आणि साक्षरतेचा अभाव यामुळे गेल्या १० वर्षांत गर्भाशय काढण्याचे प्रमाण वाढत आहे. संशोधनानुसार १०० पैकी दर ५ महिलांचे गर्भाशय काढण्यात येत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले. यासंबंधित नुकतेच करण्यात आलेल्या संशोधनानुसार ही गंभीर बाब समोर आली आहे. देशात सगळ्यात जास्त गर्भाशय काढण्याचे प्रमाण आंध्र प्रदेशात असून, त्याखालोखाल तेलगंणा राज्यात आहे.

गौरव गुन्नाल आणि सुदष्णा राय या लोकसंख्याशास्त्र आणि आरोग्य अभ्यासकांनी याबाबत संशोधन करण्यात आले. यामध्ये कशामुळे काढले जाते, याचे धक्कादायक गोष्टी समोर आले आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील (मजुरी) करणाऱ्या महिलांमध्ये शिक्षणाचा अभाव, शिवाय पैशांच्या आमिषाचे गर्भाशय काढले जात आहे. तसेच मासिक पाळीत होणाऱ्या त्रासामुळे ५५.४ टक्के, फायब्राइड्स गाठीमुळे १९.६ आणि गर्भाशयाचे विकारामुळे १३.९ टक्के महिला गर्भाशय काढत आहेत, असा निष्कर्ष नोंदविण्यात आले आहे. तसेच लवकर होणारे बाळंतपण, लठ्ठपणा याचा परिणाम यावर होत आहे. दरम्यान, सरकारी दवाखान्यापेक्षा खासगी दवाखान्यात मोठ्या प्रमाणात गर्भाशय काढण्यात येत आहे.

असा आहेत निष्कर्ष

-देशात २५ ते ४९ वयोगटातील महिलांमध्ये सर्वात जास्त गर्भाशय काढण्यात येत आहे.

-शेतीक्षेत्राशी निगडित व्यवसाय करणाऱ्या महिलांमध्ये याचे प्रमाण ३२ टक्के असून, इतर महिलांच्या तुलनेत यांचे प्रमाण जास्त आहे.

-देशात सगळ्यात जास्त गर्भाशय काढण्याचे प्रमाण आंध्र प्रदेश (१२.६ टक्के), त्यानंतर तेलंगणा (११.१ टक्के), बिहार (८.६ टक्के), गुजरात (६.२ टक्के) आहेत.

-सुशिक्षित महिलांपेक्षा शेती करणाऱ्या महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.

खासगीमध्ये प्रमाण जास्त

गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियामध्ये जवळपास ६७.५ टक्के खासगी केंद्रामध्ये केले जात आहे. यातुलनेत सरकारी दवाखान्यात याचे प्रमाण कमी असून, ३२.२ टक्के इतके आहे. यामध्ये ४० ते ४९ वयोगटातील महिलांचा समावेश आहे.

 ग्रामीण भागातील महिलांमध्ये गर्भाशय काढण्याचे प्रमाण जास्त असल्याचे संशोधनातून दिसून आले. विशेषत: मासिक पाळीत होणारा त्रास, आर्थिक समस्या यामुळे गर्भाशय काढले जात आहे. देशात आंध्र प्रदेशात याची भयानक स्वरूप आहे. -गौरव गुन्नाल, संशोधक

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPregnancyप्रेग्नंसी