शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

प्रलंबित गुन्हे निकाली काढण्यात झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 01:52 IST

टीआरएमचा परिणाम : पोलिसांचा कारभार गतिमान, साप्ताहिक बैठकीत आढावा

पुणे : पोलीस ठाण्यात नियमितपणे असंख्य प्रकारेचे अर्ज येत असतात़ अनेक गुन्ह्यांचा तपास न झाल्यास ते तसेच प्रलंबित असतात़ आरोपींना तसेच साक्षीदारांना समन्स बजावण्याचे कामही पोलिसांकडे मोठ्या प्रमाणावर असते़ कामाच्या धबडग्यामध्ये अनेकदा असंख्य बाबी या प्रलंबित पडत जातात़ त्याचा आता साप्ताहिक आढावा दर मंगळवारी घेतला जात असल्याने पोलिसांच्या कामावर त्याचा चांगला परिणाम दिसू लागला आहे़ त्यामुळे एक वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेले गुन्हे निकाली करण्याचा वेग वाढला असून गेल्या तीन महिन्यांत निम्मे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.

विविध प्रकारचे अर्ज, प्रलंबित गुन्हे यांची संपूर्ण आयुक्तालयाची एकत्रित यादी करण्यात आली़ हे अर्ज व प्रलंबित गुन्हे निकाली काढण्याची लाईन आॅफ अ‍ॅक्शन ठरवून देण्यात आली़ गेल्या तीन महिन्यांत जवळपास निम्मे अर्ज व प्रलंबित गुन्हे निकाली काढण्यात यश मिळाले आहे़ याबरोबर आरोपींना समन्स बजावणे, मुद्देमालाची तपासणी, रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, अशी अनेक कामे दर आठवड्याला होऊ लागली़ त्याच्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांचे सुपरव्हिजन नियमितपणे सुरू झाले़ त्याचा परिणाम आता तीन महिन्यांनंतर दिसू लागला आहे़रेकॉर्डवरील आरोपी आता नियमितपणे बीट मार्शलकडून होऊ लागल्याने आपल्याकडील रेकॉर्डवरील गुन्हेगार कोण कोण आहेत, याची माहिती केवळ तपास पथकापुरती न राहता संपूर्ण पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना झाली़ त्याचे रेकॉर्ड दर आठवड्याला अपडेट होऊ लागले़पोलीस ठाण्याचे रेकॉर्ड दर आठवड्याला अपडेट होऊलागल्याने गुन्ह्याचा कल लक्षात येऊ लागला़न्यायालयातील हजेरी वाढलीच्समन्स बजावण्याचे काम आता ९० टक्क्यांपर्यंत होऊ लागले़ त्यामुळे न्यायालयातील खटल्यांमध्ये हजर राहण्याच्या प्रमाणावर वाढ झाली आहे़च्एका वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेले गुन्हे ७११ होते़ आता तीन महिन्यांनंतर २०१ गुन्ह्यांपर्यंत ते खाली आले आहे़ तसेच शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ५ हजारांहून अधिक विविध अर्ज प्रलंबित होते़ त्यापैकी २ हजार ४३४ अर्ज निर्गती करण्यात येऊन तशी माहिती अर्जदारांना देण्यात आली आहे़च्दर आठवड्याला गुन्ह्यांची माहिती घेतली जात असल्याने वरिष्ठ अधिकाºयांनाही शहरात घडणाºया गुन्ह्यांची बारकाईने माहिती होऊ लागली आहे़ त्यानुसार तपासासंदर्भात संबंधितांना वरिष्ठ अधिकाºयांकडून मार्गदर्शन केले जाऊ लागले आहे़च्दर आठवड्याच्या बैठकीमुळे काही जणांना याचा त्रास वाटत असला तरी त्यातून चांगले परिणाम दिसू लागले असून ही बैठक दोन तास चालत असल्याने आढावा घेण्यासाठी आठवड्यातून इतका वेळ देणे सर्वांना शक्य असल्याचे अधिकाºयांनी सांगितले़

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस