शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन वाढवून नवा महाराष्ट्र घडवू - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 05:21 IST

आदित्य ठाकरे । सत्ताधारी विरोधी भेद करत नाही

पुणे : पर्यटन हा सुरूवातीपासूनच आवडीचा विषय होता. त्यामुळेच आता त्याच खात्याचा मंत्री म्हणून काम करताना सत्ताधारी विरोधी असा भेद कधीही करत नाही. सर्वांना बरोबर घेऊन एक नवा महाराष्ट्र घडवू, असा निर्धार राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाउंडेशन तसेच विविध योजनांच्या संकेतस्थळाचे उद््घाटन पुण्यात शनिवारी करण्यात आले. पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेता मिलिंद गुणाजी, निर्माती दीपशिखा, पर्यटन विभागाच्या सचिव वलसा नायर सिंग व्यासपीठावर उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, पर्यटनाचा विकास झाला तर रोजगार निर्माण होतील. महाविकास आघाडीत युवा आमदारांची संख्या जास्त आहे. आम्ही एकत्र असतो. प्रत्येकजण नवे काही केले तर ते दुसऱ्यापर्यंत पोहचवतो. यातूनच नव्या महाराष्ट्राची सुरूवात होणार आहे.रोहित पवार म्हणाले, गावातून शहरात जाताना शेतात आलेले काही ना काहीतरी नेले जाते. त्याचप्रमाणे शहरातील लोकांनीही गावाकडे येताना गावाला काही द्यावे, ते मातीचे देणे समजावे अशा उद्देशाने फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे.एकात्मिक विकास फाउंडेशनच्या बोधचिन्हाचे, गीताचे, मतदार संघातील पर्यटनस्थळांची माहिती असणाºया संकेतस्थळाचे, कर्जत जामखेड येथील पर्यटनाच्या माहिती देणाºया वेबसिरिजचे पाहुण्यांच्या हस्ते उद््घाटन, अनावरण करण्यात आले. आयआयटी पवई व टाटा इनस्टिट्यूट सोशल सायन्स या दोन संस्थाबरोबर कर्जत जामखेड मतदारसंघातील विकास कामांच्या संशोधन व विकास यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

टॅग्स :environmentपर्यावरणAaditya Thackerayआदित्य ठाकरेPuneपुणे