शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

मनुष्यबळाचा तुटवडा वाढता वाढे, अग्निशामक दल सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 02:44 IST

महापालिकेचा एक विभाग असलेल्या अग्निशामक दलाकडे अत्याधुनिक वाहने आली़ नवनवीन साधने मिळाली़ एका नवीन छोट्या केंद्राची भरही पडली असली तरी मनुष्यबळाचा तुटवडा काही केल्या कमी होताना दिसत नाही.

पुणे  - महापालिकेचा एक विभाग असलेल्या अग्निशामक दलाकडे अत्याधुनिक वाहने आली़ नवनवीन साधने मिळाली़ एका नवीन छोट्या केंद्राची भरही पडली असली तरी मनुष्यबळाचा तुटवडा काही केल्या कमी होताना दिसत नाही़ उलट सेवानिवृत्ती, वैद्यकीयदृष्ट्या अनफिट आणि खातेबदल यामुळे गेल्या वर्षी असलेल्या संख्येपेक्षा कमी संख्या बळावर अग्निशामक दल शहरातील आपत्तींमध्ये वेळेवर धावून जाऊन मदत करीत आले आहे़अत्यावश्यक सेवेकडे महापालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे़ अग्निशामक दलामध्ये आवश्यक असलेल्या ९८० कर्मचाऱ्यांपैकी गेल्या वर्षी ४९० कर्मचारी होते़ गतवर्षभरात त्यात वेगवेगळ्या कारणाने घट झाली़ पण नवीन भरती न झाल्याने आता केवळ ४५० कर्मचारी उरले आहेत़ त्यांच्या भरवशावर सध्या अग्निशामक दलाकडून पुणेकरांना तत्परतेने सेवा पुरविली जात आहे़ पुणे महापालिकेच्या हद्दीत १३ अग्निशामक केंद्रे असून जनता वसाहत येथे १४ वे छोटे केंद्र सुरु करण्यात आले आहे़.समाविष्ट गावांत नाही सुविधा : केंद्र उभारण्यासाठी जागांचा प्रस्तावमहापालिकेमध्ये ११ गावांचा समावेश होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला असला, तरीही ही गावे अग्निशमन सुविधेपासून दूरच आहेत़या गावांमध्ये अग्निशमन सेवा पुरविण्यासाठी तेथे केंद्र उभारावी लागणार आहेत़ त्यासाठीअग्निशामक दलाने तसा प्रस्ताव दिला असून, जागा आरक्षित करण्यास सांगण्यात आले आहे़महापालिका प्रशासनाकडून त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशांत रणपिसे यांनी सांगितले़रॉकेट, बाण सर्वाधिक धोकादायकदिवाळीत प्रामुख्याने आगी लागण्याच्या अनेक घटना घडतात़ अग्निशामक दलाने केलेल्या जनजागृतीमुळे गेल्या काही वर्षांमध्ये आगीच्या घटनांमध्ये घट झाली आहे़ २०१६मध्ये दिवाळीत आगीच्या १७ घटना घडल्या होत्या़ तर गेल्या वर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोन आगीच्या घटना घडल्या होत्या़ त्या दोन्ही आगी बाणामुळे लागल्या होता़ दिवाळीत उडविले जाणारे फटाकेच प्रामुख्याने आगीला कारणीभूत ठरतात़ त्यातील अनेक आगी या रॉकेट आणि पॅराशूट या फटक्यांमुळे लागल्या होत्या़ रॉकेट व्यवस्थित आकाशात न जाता ते इकडे- तिकडे जाण्यामुळे वाळलेले गवत, कचराकुंडी, झाडे पेटून आगी लागल्याचा घटना प्रामुख्याने घडतात़ त्यामुळे असे फटाका उडविताना सर्वांनी काळजी घ्यावी़दिवाळीत आगी लागण्याच्या अनेक घटना घडतात़ त्यासाठी अग्निशामक दल नेहमीच तयारीत असते़ याबाबत अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले, की सर्व गाड्या पाण्याने भरून ठेवण्यात आल्या आहेत़सर्व कर्मचाºयांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून, सर्व वाहने व साहित्य सुसज्ज ठेवण्यात आली आहेत़ या कर्मचाºयांसह अग्निशामक दलाकडे प्रशिक्षणासाठी विविध शहरांतील कर्मचारी येत असतात़ अशा ३० प्रशिक्षणार्थींना ३ शिफ्टमध्ये मदतीला घेण्यात येत आहे़सेफ्ट कीड्स या स्वयंसेवी संस्थेमार्फत फटाकेविरहित दिवाळी हा उपक्रम सुरू केला आहे़ शाळा, महाविद्यालयांत जाऊन संस्थेचे स्वयंसेवक जनजागृती करीत आहेत़फटाके उडविताना घ्यावयाची दक्षतालहान मुलांना एकट्याने फटाके उडवू देऊ नका़ त्यांच्यासोबत मोठ्या व्यक्तींनी राहावे़पेटते फुलबाजे शरीरापासून दूर धरावेत़ पेटते फुलबाजे वरून खाली टाकू नयेत़ तसेच खालून वर फेकू नयेत़फटाके उडविताना टेरिकॉट, नायलॉन इत्यादी कृत्रिम धाग्यांपासून बनविलेले कपडे वापरू नयेत़ तसेच फटाके कधीही खिशात ठेवू नयेत़भुईनळे हातात धरून उडवू नयेत़बाण उडविताना ते मोकळ्या जागेत, बाटलीत सरळ ठेवून उडवावेत़ हातात धरून उडवू नयेत़आकाशात उंचावर उडणारे फटाके टेरेसवर, बाल्कनीमध्ये पडून बºयाचदा आगी लागतात़ त्यामुळे दिवाळीत टेरेसवरील तसेच बाल्कनीमधील टाकाऊ तसेच अन्य वस्तू काढून टाकाव्यात़फटाक्यावर डबा किंवा अन्य वस्तू झाकून उडवू नयेत़ त्यामुळे इजा होण्याची शक्यता असते़फटाके न फुटल्यास अशाफटाक्यांची दारू काढून ती पेटवूनये़ त्यामुळे डोळ्यांना गंभीरदुखापत होऊन अंधत्व येण्याची शक्यता असते़फटाके उडविताना, हाताशी पाणी राहील अशी व्यवस्था करावी़ चुकून भाजल्यास भाजलेला भाग पाण्याखाली धरावा़ फुलबाजे वापरून झाल्यावर त्याची तार इतरत्र न टाकता त्वरित पाण्यात टाकावी़खिडक्या, दरवाज्यांना असलेल्या पडद्याखाली पणत्या लावू नयेत़आपत्कालीनप्रसंगी अग्निशामक दलाशी १०१ वर संपर्क साधावा़भुईचक्र व जमिनीवर फिरणारे फटाके लाथाळू नयेत़

टॅग्स :fire brigade puneपुणे अग्निशामक दलPuneपुणे