शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

पुणे विभागात एसटीच्या उत्पन्नात वाढ; शिवशाहीमुळे वाढले उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 14:56 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाच्या उत्पन्नात मागीलवर्षी वाढ झाली आहे. २०१६ मध्ये तोट्यात असलेल्या पुणे विभागाला २०१७ मध्ये सुमारे २० लाख २५ हजार रुपयांचा नफा झाला आहे. 

ठळक मुद्दे२०१६ मध्ये पुणे विभागाला मिळाले होते सुमारे ३५ कोटी ९७ लाख रुपयांचे उत्पन्नपुणे विभागाला २०१७ मध्ये सुमारे २० लाख २५ हजार रुपयांचा नफा

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाच्या उत्पन्नात मागीलवर्षी वाढ झाली आहे. २०१६ मध्ये तोट्यात असलेल्या पुणे विभागाला २०१७ मध्ये सुमारे २० लाख २५ हजार रुपयांचा नफा झाला आहे. विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०१७ मध्ये विभागामार्फत सोमवती अमावस्या, दत्तजयंती, उत्सव व यात्रा कालावधी तसेच ख्रिसमस सुट््यांमध्ये जादा वाहतुक करण्यात आली. याला मिळालेल्या प्रवासांच्या प्रतिसादामुळे उत्पन्नात भर पडली आहे. तसेच पुणे-कोल्हापुर, पुणे-नाशिक, पुणे-पणजी, पुणे-शिर्डी, पुणे-तुळजापुर, पुणे-दापोली, पुणे-चिपळूण अशा विविध मार्गावरील शिवशाही बसेसच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. २०१६ मध्ये पुणे विभागाला सुमारे ३५ कोटी ९७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, त्याहून अधिक खर्च झाल्याने यावर्षी सुमारे २७ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. तर २०१७ मध्ये विभागाच्या उत्पन्नात किंचित वाढ होऊन ते सुमारे ३६ कोटी आठ लाख रुपयांपर्यंत पोहचले. तसेच मागील वर्षी खर्च कमी करण्यातही विभागाला यश आले. त्यामुळे हा खर्च ३५ कोटी ८८ लाखांपर्यंत खाली आला. परिणामी एसटीला २० लाख २५ हजार रुपयांचा नफा झाला आहे. शिवाजीनगर आगार सर्वाधिक यशस्वी ठरले असून या आगाराला मागील वर्षी १ कोटी ३६ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. त्याखालोखाल स्वारगेट व बारामती आगाराला अनुक्रमे ४५ लाख ६६ हजार आणि २२ लाख ९१ हजार रुपयांचा नफा मिळाला. 

एसटीच्या पुणे विभागाची दोन वर्षांची स्थितीवर्ष        २०१६            २०१७किलोमीटर    १,०३,३२,०००        १,००,२३,०००उत्पन्न        ३५,९७,१६,०००        ३६,०८,५१,०००खर्च        ३६,७४,३४,०००        ३५,८८,२६,०००नफा/तोटा    २७,१८,००० (तोटा)        २०,२५,००० (नफा)

प्रमुख आगारांचा निव्वळ नफाआगार                     नफाशिवाजीनगर    १,३५,९८,०००स्वारगेट        ४५,६६,०००बारामती    २२,९१,०००

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळPuneपुणे