शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

ई-वे बिलाच्या मर्यादेत वाढ करा : राजेश शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 8:11 PM

जीएसटी कर लागू असलेल्या सर्व वस्तूंची आंतरराज्य वाहतूक करण्यासाठी ई-वे बिलाची सध्याची असलेली मर्यादा एक ते दोन लाख रुपयांपर्यंत वाढवावी.

ठळक मुद्देकेंद्र शासनाची मे २०१८ पासून संपूर्ण देशभर ई वे बिल सुरु देशात एकच कायदा असताना राज्यांमध्ये ई-वे बिलमध्ये फरक

पुणे : केंद्र शासनाने संपूर्ण देशात एकच कर प्रणाली लागू करण्यासाठी ‘जीएसटी’ आणला. परंतु ई-वे बिलमुळे मालाच्या किंमतींमध्ये मोठा फरक पडत आहे. यामुळेच महाराष्ट्र शासनाने राज्यात जीएसटी कर लागू असलेल्या सर्व वस्तूंची आंतरराज्य वाहतूक करण्यासाठी ई-वे बिलाची सध्याची असलेली मर्यादा एक ते दोन लाख रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी फेडरेशन आॅफ असोसिएशनस आॅफ महाराष्ट्र (फास) चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी केली.  याबाबत शहा यांनी सांगितले की, केंद्र शासनाने मे २०१८ पासून संपूर्ण देशभर ई वे बिल सुरु करण्यात आलेले आहे. त्यानुसार जी.एस.टी. कर लागू असलेला सर्व वस्तू राज्याबाहेर तसेच राज्यांतर्गत पाठवण्यासाठी ई वे बिल बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात २५ मे पासून ई-वे बिलाच्या अंमलबजावणीस सुरुवात केली. पण काही राज्यांनी जी.एस.टी. ची बिलाची मर्यादा एक लाख रुपयेपर्यंत वाढवली आहे. जीएसटी हा संपूर्ण देशात एकच कायदा असताना देशातील वेगवेगळ्या राज्यांत मालाच्या बिलाच्या मर्यादेत तफावत दिसून येत आहे. पश्चिम बंगाल मध्ये एक लाख रुपयेपर्यतचा जीएसटीचा माल राज्यातल्या राज्यात पाठवण्याकरिता ई वे बिलाची आवश्यकता नाही. तसेच तामिळनाडूमध्ये एक लाख रुपयेपर्यंतच्या १०० वस्तूंवर उदा: कृषि अवजारे, सौर पॉवर पंप सेट, अन्न पदार्थ उत्पादने, ताजी फळे आणि भाज्या, कपडे उत्पादने, जॉब वर्क व यासंबधित सेवा वस्तूंची आंतरराज्य वाहतूक करण्यासाठी ई वे बिलातून सूट देण्यात आली आहे.      महाराष्ट्रात ही मर्यादा ५० हजार रुपये इतकी आहे. ई वे बिल जनरेट करणे ही प्रक्रिया तशी किचकट आहे. त्याकरिता कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. तरी महाराष्ट्र शासनाने जीएसटी कर लागू असलेला सर्व वस्तूंची आंतरराज्य वाहतूक करण्यासाठी ई वे बिलाची सध्याची असलेली मर्यादा एक ते दोन लाख रुपये पर्यंत वाढवावी अशी मागणी शहा यांनी केली.  

टॅग्स :PuneपुणेGSTजीएसटीCentral Governmentकेंद्र सरकारTaxकर