पुणे : पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ५७० जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर १ हजार ५५६ कोरोनाबधितांची वाढ झाली आहे. आज दिवसभरात ४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी ९ जण पुण्याबाहेरील रहिवाशी आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सायंकाळी सात वाजेपर्यंत विविध रूग्णांलयात ७९३ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ४८३ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २ हजार ५९२ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आजपर्यंत शहरात एकूण ८० हजार ५९३ जण कोरोना बाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १४ हजार ७५७ इतकी आहे़. तसेच आतापर्यंत ६३ हजार ९१९ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत़. तर शहरात आत्तापर्यंत १ हजार ९१७ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. -----------------------------------दिवसभरात विविध केंद्रांवर ७ हजार २०८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत शहरात तपासणीचा आकडा ३ लाख ९१ हजार ३६ वर गेला आहे़ ------
पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ५५६ नवीन कोरोनाबाधितांची वाढ ; ४४ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 20:10 IST
आतापर्यंत ६३ हजार ९१९ जण कोरोना मुक्त होऊन परतले घरी
पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ५५६ नवीन कोरोनाबाधितांची वाढ ; ४४ जणांचा मृत्यू
ठळक मुद्देदिवसभरात १ हजार ५७० जण कोरोनामुक्त; विविध रूग्णांलयात ७९३ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू सद्यस्थितीला अॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १४ हजार ७५७