शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अमनोरा पार्कचे देशपांडे IT च्या रडारवर, सकाळ-सकाळ १४ गाड्यांतून आले अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 06:09 IST

शरद पवार यांच्या निकटवर्तीयावर पुणे, रोहा येथे एकाच वेळी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क  पुणे : आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून बांधकाम व्यावसायिक आणि सिटी काॅर्पोरेशनचे चेअरमन अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने बुधवारी छापेमारी केली. उद्योजक देशपांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. अविनाश भोसले यांच्या पाठोपाठ पुण्यातीलच एका बड्या व्यावसायिकावर कारवाई झाल्यामुळे राजकीय वर्तुळातही या खळबळ उडाली. याशिवाय रोहाजवळील केळतवाडी येथील घरीही पथक धडकले होते. रात्री उशिरापर्यंत झाडाझडती सुरू होती. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.

देशपांडे यांची सिटी काॅर्पोरेशन लिमिटेड ही बांधकाम कंपनी आहे. या कंपनीचे कार्यालय डेक्कन जिमखाना भागातील फर्ग्युसन रस्त्यावर आहे, तसेच हडपसर भागातील अमानोरा पार्क परिसरात एक कार्यालय आहे. त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानातून काही कागदपत्रे प्राप्तिकरच्या पथकांनी ताब्यात घेतली  आहेत. 

१४ वाहनांतून आले पथकरोहा (जि. रायगड) : शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या केळतवाडी येथे अनिरुद्ध देशपांडे यांची शेकडो एकर मालमत्ता आहे, केलजाई इको रिझर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही त्याचाच एक भाग आहे. या ठिकाणी सकाळी सुमारे १४ वाहनांतून अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा आला. त्यांनी कंपनीच्या कार्यालयात व घरावर एकाच वेळी छापेमारी केली. मुख्य प्रवेशद्वार बंद करून कोणालाही बाहेर जाण्यास मनाई केली होती.

मुंबई आणि दिल्ली येथून आलेल्या प्राप्तिकरच्या पथकांनी सकाळपासूनच एकाच वेळी पुणे तसेच रोहा येथे कारवाईला सुरुवात केली. पथकाने काही कागदपत्रे, इलेक्ट्राॅनिक साधने जप्त केली. 

अमोनोरा पार्कमुळे आले प्रसिद्धीला! n ३० वर्षांपासून देशपांडे हे बांधकाम क्षेत्रात आहेत. अमोनोरा पार्क ही अत्याधुनिक सॅटेलाइट सिटी असून तिचा खूप बोलबाला झाला. n सिटी कॉर्पोरेशनमध्ये ६ संचालक आहेत. बांधकाम व्यवसाय क्षेत्राशिवाय सॉफ्टवेअर, मनोरंजन आदी क्षेत्राशी देशपांडे संबंधित आहेत.n देशपांडे यांनी खेळांशी संबंधित संस्था स्थापन केल्या असून, ते क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कार रेसिंग, कुस्ती आदी खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम करत असतात.

 

टॅग्स :PuneपुणेITमाहिती तंत्रज्ञानIncome Taxइन्कम टॅक्सraidधाड