रामनगरमध्ये दरड कोसळण्याची घटना
By Admin | Updated: August 1, 2014 05:19 IST2014-08-01T05:19:39+5:302014-08-01T05:19:39+5:30
सततच्या पावसामुळे रामनगर येथील तारकेश्वर टेकडीची दरड कोसळली. दरड जमिनीवर पडल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही

रामनगरमध्ये दरड कोसळण्याची घटना
येरवडा : सततच्या पावसामुळे रामनगर येथील तारकेश्वर टेकडीची दरड कोसळली. दरड जमिनीवर पडल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. येथील अनेक घरे टेकडीकडेला आहेत. येथील सर्व घरांना घरे खाली करण्याच्या नोटिसा येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने देण्यात आल्या असल्याची माहिती सहायक महापालिका आयुक्त संध्या गागरे यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यातील
माळीण गावात दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या
वतीने हद्दीतील डोंगरभागाकडेला असणाऱ्या २५० घरांना घर खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)