शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात अजब चोरी : पोलिसांच्या जॅमरसह दुचाकी घेऊन मालक फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 19:53 IST

नो पार्किंगमध्ये लावलेल्या गाडीला पोलिसांनी लावलेला जॅमरसह गाडी घेऊन जाण्याच्या प्रताप पुण्यात घडला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

पुणे : नो पार्किंगमध्ये लावलेल्या गाडीला पोलिसांनी लावलेला जॅमरसह गाडी घेऊन जाण्याच्या प्रताप पुण्यात घडला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

     पुणे शहरात दिवसेंदिवस गाड्यांची संख्या वाढत असून त्यांच्या वाहतुकीसाठी रस्ते अपुरे पडत आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेने शक्य तिथे पार्किंगची सुविधा, रस्त्यांवर सम व विषम तारखेला समोरासमोर गाड्या लावण्याची परवानगी दिली आहे. मात्र तरीही गाडी परवानगी नसलेल्या ठिकाणी लावणाऱ्या नागरिकांना दंड केला जातो. प्रत्यक्ष स्थळी नागरिक उपस्थित नसल्यास काहीवेळा गाडी उचलून नेली जाते तर काहीवेळा गाडीला जॅमर लावला जातो. अशा स्थितीत नागरिकांना जवळच्या पोलीस वाहनतळावर जाऊन दंड भरून गाडी परत आणावी लागते.  काही महिन्यांपूर्वी याच पद्धतीने गाडीला लावलेला जॅमर नेणाऱ्या चारचाकी धारकाला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली होती. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने चोर पकडणे शक्य झाल्याने याही प्रकरणी तसा तपास केला जाण्याची शक्यता आहे. 

   या पद्धतीने सोमवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास शहरातील मॉडर्न कॉलनीतील चित्तरंजन वाटिकेच्या जवळील थोरात चौकात वाहतूक पोलिसांनी १५०० रुपये किमतीचा जॅमर लावला होता. मात्र संबंधित  दुचाकी धारकाने दंड चुकवण्यासाठी जॅमरसह दुचाकी काढून नेल्याचे निदर्शनास लक्षात आले आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसCrimeगुन्हा