ढमढेरे विद्यालयात अवकाश विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:07 IST2021-02-05T05:07:00+5:302021-02-05T05:07:00+5:30
लायन्स क्लब ऑफ पुणे यांच्या वतीने तळेगाव ढमढेरे येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे प्राथमिक विद्यालयात देण्यात आलेल्या ग्रंथालय व अवकाश ...

ढमढेरे विद्यालयात अवकाश विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन
लायन्स क्लब ऑफ पुणे यांच्या वतीने तळेगाव ढमढेरे येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे प्राथमिक विद्यालयात देण्यात आलेल्या ग्रंथालय व अवकाश विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रांतपाल अभय शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अवकाश विज्ञान प्रयोग शाळेत शालेय स्तरावरील प्राथमिक स्वरूपाचे अवकाश निरीक्षण व संशोधन करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य ३ टेलिस्कोप,दुर्बीण सूर्य या अवकाश निरीक्षणासाठी लागणारे फिल्टर्स असे महत्त्वाचे साहित्य देण्यात आले आहे.यातून विद्यार्थी अवकाश निरीक्षण व प्राथमिक स्वरूपाचे संशोधन करू शकतात.
व ग्रामीण भागातील विद्यार्थी यातून संशोधक बनतील. ग्रंथालयांमध्ये ७५० पुस्तके देऊन भव्य स्वरूपाचे ग्रंथालय प्रदान करण्यात आले.यावेळी लायन्स क्लबचे प्रांतपाल अभय शास्त्री,माजी प्रांतपाल सी.डी सेठ,सचिव राहुल शहा,कोशाध्यक्षा जयश्री दिवाकर,डॉ.प्रसाद खंडागळे,खगोलशास्त्रज्ञ डॉ.विशाल कुंभारे,लायन प्रकाश नारके,सरिता सोनवणे, सुधीर बाळसराफ,मुख्याध्यापक साधना वाघोले,अशोक राऊत,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालिंदर आदक,प्रियांका कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
अवकाश विज्ञान प्रयोगशाळा ग्रामीण भागातील पंचक्रोशीतील सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना अवकाश निरीक्षणासाठी खुली ठेवण्यात येणार आहे.
-प्रकाश नारके-लायन
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे विद्यार्थी पालक व शिक्षकांना मार्गदर्शन करताना लायन्स क्लबचे प्रांतपाल अभय शास्त्री. तळेगाव ढमढेरे येथे अवकाश विज्ञान प्रयोग शाळेचे उद्घाटन करताना लायन्सचे प्रांतपाल अभय शास्त्री