शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi in Pune| 'असे' होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते Pune Metro चे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 17:10 IST

सर्व वाहतूक, दुकाने, व्यावसायिक आस्थापना, रहिवासी इमारती सुरक्षेच्या कारणास्तव बंद...

पुणे : महामेट्रोच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi pune tour) यांचे मेट्रो स्थानकात (pune metro) स्वागत झाल्यानंतर प्रत्येक मिनिटाचा कार्यक्रम ठरला आहे. यावेळात कर्वे रस्त्यावरील सर्व वाहतूक, दुकाने, व्यावसायिक आस्थापना, रहिवासी इमारती सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहे. मोदी यांच्या समवेत महापौर मुरली मोहोळ (murlidhar mohol) तसेच अन्य प्रमुख पाहुणे तसेच महामेट्रोचे (mahametro) व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित (brijesh dikshit) व अन्य वरिष्ठ अधिकारी अशा निवडक व्यक्तीच असतील.

असा होईल कार्यक्रम

  1. खंडूजीबाबा चौकमार्गे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानकाजवळ आगमन
  2.  सरकत्या जिन्याने मोदी व प्रमुख पाहुणे स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर येतील.
  3. तिथे मोदी यांच्या हस्ते फीत कापून स्थानकाचे उद्घाटन होईल.
  4. स्थानकात कोनशीला बसवण्यात आली आहे, त्याचे अनावरण मोदी करतील.
  5. स्थानकात महामेट्रोने मेट्रोच्या छायाचित्रांचा एक माहिती कक्ष केला आहे. मोदी त्याची पाहणी करतील.
  6. पुणे तिथे काय उणे या नावाचे महामेट्रोने कॉफी टेबल बूक केले आहे. त्याचे प्रकाशन मोदी यांच्या हस्ते होईल. 
  7. लिफ्टने मोदी स्थानकाच्या दुसऱ्या मजल्यावर जातील.
  8. मोदी यांच्या हस्ते एक कळ दाबली जाईल. त्यामुळे मेट्रोसाठी ग्रीन सिग्नल मिळेल.
  9. पिंपरी ते फुगेवाडी (pimpari to fugewadi metro inauguration) या मार्गालाही याच पद्धतीने मोदी इथूनच ग्रीन सिग्नल देतील.
  10. वनाज ते गरवारे महाविद्याल (wanaj to gaeware metro) व पिंपरी ते फुगेवाडी या मेट्रोचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात येईल.
  11. मोदी व प्रमुख पाहुणे मेट्रोत बसतील. आत बसल्यावर मोदी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील.
  12. त्यानंतर मेट्रो सुरू होईल. ४० च्या वेगाने ती आनंदनगरला पोहचेल.
  13. आनंदनगर स्थानकात पंतप्रधान मोदी मेट्रोतून पायउतार होतील व पुढील कार्यक्रमासाठी रवाना होतील. 

महामेट्रोच्या वतीने या उद्घाटनानंतर दुपारी ३ वाजल्यापासून लगेचच वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर व्यावसायिक तत्वावर मेट्रो सुरू होणार आहे. वनाज पासून गरवारे स्थानकापर्यंत व गरवारे स्थानकापासून ते वनाज पर्यंत असे दोन्ही मार्ग सुरू होतील. त्याचे किमान तिकीट १० रूपये व कमाल २० रूपये आहे. परतीचे तिकीट (रिटर्न) ३० रूपये आहे. रात्री ९ वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहील. दुसऱ्या दिवशी (सोमवार, दि. ७) सकाळी ८ ते रात्री ९ या वेळात दर अर्ध्या तासाने १ याप्रमाणे मेट्रो सुरू राहील. पिंपरी ते फुगेवाडी हा मार्गही याच पद्धतीने लगेचच त्याच दिवसापासून सुरू होणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMetroमेट्रोPuneपुणेpimpri-acपिंपरीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड