भोरमध्ये स्काऊट गाईड प्रशिक्षण केंद्रात कोविड सेंटरचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:09 IST2021-04-25T04:09:37+5:302021-04-25T04:09:37+5:30
भोर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भोर शहरातील रामबाग येथील स्काउट गाईट प्रशिक्षण केंद्रामध्ये कोविड ...

भोरमध्ये स्काऊट गाईड प्रशिक्षण केंद्रात कोविड सेंटरचे उद्घाटन
भोर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भोर शहरातील रामबाग येथील स्काउट गाईट प्रशिक्षण केंद्रामध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामध्ये ५० बेडची सुविधा असून त्यामुळे भोरवासीयांची मोठी सोय होणार आहे.
सेंटरचे उद्घाटन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते झाले. या वेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार आजित पाटील, मुख्याधिकारी विजयकुमार थोरात, जि. प. सदस्य विठ्ठल आवाळे, डॉ. दत्तात्रय बामणे, अनिल पवार, महेश धरू, प्रशांत शेटे, विजय मांढरे, उपनगराध्यक्ष अमित सांगळे, तृप्ती किरवे, गणेश मोहिते, गणेश पवार, सचिन हर्णसकर, सुमंत शेटे, बजरंग शिदे, ॲड. विश्वनाथ रोमण, जगदीश गुजराथी, चंद्रकांत मळेकर, राजेंद्र बहिरट, गजानन शेटे, महेंद्र बांदल, अभिजित सोनावले व नगरसेवक उपस्थित होते.
भोर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सुविधा असलेले ५० बेडचे कोविड हेल्थ केअर सेंटर, रथखाना येथे १०० बेडचे कोविड सेंटर, तर हरजीवन हॉस्पिटल व गोरेगावकर दवाखान्यात ऑक्सिजन बेड असलेले कोविड सेटर सुरू आहे. सिध्दिविनायक दवाखाना, सूर्यवंशी दवाखाना व ससेवाडी येथेही कोविड सेटर सुरू आहे. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ही सारी कोविड सेंटर अपुरी पडत असल्यामुळे रामबाग येथील स्काउट गाईट येथील इमारतीमध्ये सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या सुमारे ५० रुग्णांची सोय होणार आहे.
--
चौकट
कोरोना सेंटरमध्ये ५० बेडची सोय असून, त्यातील २५ महिलांसाठी व २५ पुरुषांसाठी अशी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. येथील रुग्णांच्या सेवेसाठी भोर शहर किराणा भुसार असोसिएशन यांच्या वतीने ४० गाद्या, ४० बेडशिट आणि ४० चादरी देण्यात आल्या आहेत. नगरसेवकांच्या वतीने रुग्णांसाठी फळे, अंडी व दूध देणार येणार असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
--
२४ भोर नवे कोविड केअर सेंटर उद्घाटन
स्काऊड गाइड प्रशिक्षण केंद्र येथे कोविड सेंटरचे उद्घाटन करताना आमदार संग्राम थोपटे.