शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बारामती गणेश फेस्टिव्हलचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 02:10 IST

शहराचा सर्वांगीण विकास होताना त्याला पक्षीय राजकारणातून गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा माजी उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी दिला.

बारामती : शहराच्या सांस्कृतिक परंपरेला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत आहे. शहराची स्वतंत्र सांस्कृतिक परंपरा आहे. मात्र, शहराचा सर्वांगीण विकास होताना त्याला पक्षीय राजकारणातून गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा माजी उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी दिला.येथील बारामती गणेश फेस्टिव्हल २०१८ चे उद्घाटन दीपप्रज्ज्वलन करून पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पवार बोलत होते. पवार म्हणाले, की या फेस्टिव्हलला किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांना विरोध करण्यापेक्षा बारामतीकर नागरिकांकरिता अशा पद्धतीचे गणेशोत्सव साजरे करा की, ज्यातून समाजातील सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ आपल्या कुटुंबासमवेत बसून अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येईल. विनाकारण खीळ घालण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.बारामती गणेश फेस्टिव्हलचे आयोजक नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सुनेत्रा पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, पंचायत सभापती संजय भोसले, संदीप जगताप, राजेंद्र काटे, इम्तियाज शिकीलकर, संभाजी होळकर, पार्थ पवार, जय पवार आदी उपस्थित होते. दरम्यान, फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी बारामती गणेश फेस्टिव्हलमध्ये हभप निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसGanpati Festivalगणेशोत्सव